मुंबई

बेकायदा गोदामावर सिडकोचा हातोडा

CD

उरण, ता. ११ ः सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या विभागातील मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीत कलंबुसरे-कोपोली रस्त्यावर विनापरवानगी गोदाम बांधण्यात आले होते. या बांधकामावर नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाने मंगळवारी (ता. ११) पोलिस फौजफाट्यासह कारवाई केली.
सिडकोच्या नैना प्राधिकरणच्या अतिक्रमण विभागाने जासई, वेश्वी, विंधणे, सारडे ग्रामपंचायत हद्दीत व्यावसायिकांच्या बेकायदा गोदाम तसेच इमारतीच्या बांधकामावर कारवाईचा बडगा उगारला होता; मात्र उरण तालुक्यातील जासई, चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, मोठी जुई, चिरनेर, कोप्रोली, बांधपाडा, पिरकोन, सारडे ग्रामपंचायत हद्दीत मात्र विनापरवानी गोदाम, इमारतीचे बांधकाम सुरू असल्याचे चित्र राजरोसपणे पाहावयास मिळत आहे. अशाच पद्धतीने उरण तालुक्यातील मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील सर्व्हे गट क्रमांक १६७/१ या जागेवर विनापरवानगी गोदामांचे बांधकाम केले गेले होते. यासंदर्भात सिडकोच्या नैना प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रार दाखल होताच कलीम बिन्ना शाह व आरीफ बिन्ना शाह या व्यावसायिकांना महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगर नियोजन अधिनियम १९६६ च्या कलम क्रमांक ५४ (१) अन्वये नोटीस बजावण्यात आली होती; मात्र तरीदेखील संबंधितांनी कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याने पोलिस फौजफाट्यासह सिडकोने कारवाई केली आहे.
--------------------------------
सिडकोच्या नैना विभागाकडून व्यावसायिकांनी कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे एक वर्षापूर्वीच नोटीस देण्यात आली होती. नैनाची परवानगी नसल्याने ही कारवाई केली आहे.
- प्रमोद पाटील, वरिष्ठ अभियंता, नैना प्राधिकरण अतिक्रमण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT