मुंबई

वेठबिगारी करणाऱ्या कुटुंबाची मुक्तता

CD

भिवंडी, ता. ११ (बातमीदार) : आदिवासी कुटुंबीयांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत ठाणे व पालघर जिल्ह्यात वेठबिगार म्हणून राबवून घेत त्यांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक केली जात आहे. अशाच एका कुटुंबाने वीटभट्टी मालकाच्या तावडीतून सुटका करून घेतली. पीडित बुधाजी जाधव याने दिलेला जबाब नोंदवून भिवंडी तालुका पोलिसांनी सिद्दिक हुसेन शेख व त्याची दोन मुले अरबाज व अरफात असे तिघांविरोधात बेठबिगार, बालमजूर, अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
बुध्या श्रीपत जाधव, पत्नी बबी जाधव, मुलगे कैलास जाधव व गौरव जाधव हे कातकरी कुटुंब भिवंडी तालुक्यातील पच्छापूर परिसरातील महाप येथील आहे. हे कुटुंब गेल्या चार वर्षांपासून चिंबीपाडा येथे सिद्दिक हुसेन शेख व त्याची दोन मुले अरबाज व अरफात (रा. टेंभिवली) यांच्या वीटभट्टीवर काम करण्यास गेले होते. मागील चार वर्षांपासून शेख यांनी जाधव कुटुंबाला आपल्या वीटभट्टीवर ठेऊन घेतले होते. त्यांच्या कामाचा मोबदला न देताच उलट त्यांच्या अंगावर कर्ज असल्याचे धमकावत होते. आपल्याशिवाय इतर कोठेही काम करता येणार नाही, असे सांगत वेठबिगार म्हणून त्यांच्याकडून राबवून घेतले जात होते.

-------------------
रात्रीच्या वेळी पलायन
चार जुलै रोजी रात्री अंधाराचा फायदा घेत जाधव कुटुंबाने वीटभट्टीवरील झोपडीतून पळ काढला. पहाटे पायी प्रवास करत त्यांनी आपले घर गाठले. आपल्यावर झालेल्या अन्यायाची हकिकत जाधव कुटुंबाने गावातील मधू वाघे यांना सांगितली. वाघे यांनी पीडित कुटुंबाला घेऊन श्रमजीवी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सापटे यांच्यासमोर समस्या मांडली. अशोक सापटे यांना पीडित कुटुंबाची वेठबिगार म्हणून पिळवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी कार्यकर्त्यांच्या सोबतीने पीडित कुटुंबासह भिवंडी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT