मुंबई

जैन साधूच्या हत्येप्रकरणी त्वरित कारवाई करा

CD

मुंबई, ता. ११ : जैन समाजाचे तपस्वी गुरुदेव आचार्य श्री कामकुमार नंदी जी महाराज यांच्या कर्नाटकातील आश्रमात घुसून समाजकंटकांनी त्यांची हत्या केल्याप्रकरणी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी काही जैन संघटनांसह महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन दोषींवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. या वेळी श्री दिगंबर जैन ग्लोबल महासभेचे सदस्य आणि भारतवर्षीय दिगंबर जैन कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

गेल्या आठवड्यात नंदी जी महाराज यांची हत्या झाली होती. हत्येमुळे जैन समाज दुखावला गेला असून, त्यांचा आक्रोश कर्नाटक सरकारने ऐकावा आणि हत्याकांडप्रकरणी त्वरित खटला दाखल करावा, अशी मागणी लोढा यांनी केली आहे. संपूर्ण देशात जैन साधू आणि साध्वी जिथे प्रवास व निवास करतील, अशा ठिकाणी चांगली सुरक्षा व्यवस्था असावी. जैन साधू व साध्वी यांना त्यांच्या पदयात्रेदरम्यान राजकीय अतिथींप्रमाणे पोलिस संरक्षण मिळावे. त्यांच्या विहारादरम्यान होणाऱ्या वाढत्या अपघातांना आळा बसावा यासाठी उपाययोजना कराव्यात, असेही लोढा यांनी निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lionel Messi ने इतिहास रचला! वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पेनल्टी हुकली, पण विक्रमाची संधी साधली...

Argentina vs Austria : ५६ वर्षानंतर चमत्कार झाला... लिओनेल मेस्सीचा World Cup मध्ये दरारा, ९६ वर्षांच्या स्पर्धा इतिहासात तिघांनाच हा पराक्रम जमलाय...

England Squad vs India T20I: भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी इंग्लंडचा संघ जाहीर; वैभव सूर्यवंशीला रोखण्यासाठी २२ वर्षीय ऑलराऊंडरला संधी

LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Bajrang Sonawane: बीडमधील खून प्रकरणात खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलावर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT