मुंबई

तरंगता कचरा, डेब्रिजच्या तक्रारी

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ११ : मुंबईतील नालेसफाई १०० टक्के झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला होता; मात्र तरंगत्या कचऱ्याने नाले तुडूंब भरले आहेत. याबाबतच्या तकारींचा पाऊस पालिकेच्या व्हॉट्सअप चॅटद्वारे पडला आहे. १ जून ते १० जुलैपर्यंत तब्बल ७७७ तक्रारी तरंगता कचरा, डेब्रिजच्या प्राप्त झाल्या आहेत. यात सर्वाधिक तक्रारींची नोंद कुर्ला, अंधेरी पश्चिम, चेंबूर, सांताक्रूझ, भांडुप परिसरातील असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम १०० टक्के पूर्ण झाले, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे; मात्र आपल्या प्रभागातील नालेसफाई झाली की नाही, याची तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअप चॅटबॉट ९३२४५००६०० हा क्रमांक उपलब्ध करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर तक्रारीसाठी व्हॉट्सअप चॅटबॉट १ जूनपासून सुरू करण्यात आला. १ जून ते १० जुलैपर्यंत यात ७७७ तक्रारींची नोंद झाल्याने १०० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाल्याच्या पालिकेच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

पालिकेकडे प्राप्त ७७७ तक्रारींपैकी मोठ्या नाल्यासंदर्भातील १९१, फ्लोटिंग कचऱ्याच्या १९१ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. नाल्यात कचरा, फ्लोटिंग कचरा या तक्रारींची दखल घेत २४ तासांत तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सर्वाधिक तक्रारी
कुर्ला - ११२
अंधेरी पश्चिम - १११
चेंबूर पूर्व पश्चिम- १११
खार, सांताक्रूझ - ८३
वडाळा, माटुंगा - ५९
भांडुप - ४४
वरळी - २९
मालाड उत्तर - ३१
माहीम धारावी - ३२
घाटकोपर - १५
मुलुंड - १३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT