मुंबई

सेंट जॉर्जमध्ये आता मोफत डायलिसीस

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ११ : किडनीचे आजार असणाऱ्या सर्वसामान्य रुग्णांना डायलिसिसचा खर्च न परवडणारा असतो. अनेक संस्था डायलिसिस सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देतात; मात्र आता राज्य शासनाच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात अशा गरजू रुग्णांसाठी किडनी डायलिसीसची मोफत सेवा उपलब्ध होणार आहे. मेन्टेनन्स हिमो डायलिसीस या सेवाअंतर्गत नव्या १२ डायलिसीस मशीनचे उद्धाटन बुधवारी सकाळी ११ वाजता वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
मोफत डायलिसिस सुविधा सुरू व्हावी, यासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर आणि त्यांची टीम गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत होते. रुग्णालयात किडनीच्‍या उपचाराधीन रुग्णांना उपचारादरम्यान डायलिसीस केले जाते; मात्र बाहेरून येणाऱ्या रुग्णांवरदेखील डायलिसीस करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. जेजे, नायर, सायन आणि केईएम रुग्णालयात अॅक्युट डायलिसीस केले जाते; पण रुग्णांचे योग्य व्यवस्थापन कोणत्याही रुग्णालयात केले जात नाही. ज्या रुग्णांना आठवड्यातून किमान दोन वेळेस डायलिसीस लागते, असे रुग्ण खासगी रुग्णालयातून डायलिसीस करून घेतात. सामान्य वर्गासाठी महिन्याला २० ते २५ हजार रुपयांचा डायलिसिससाठीचा खर्च हा परवडणारा नसतो. त्यामुळे अशा प्रकारे मोफत सेवा सुरू करणारे सेंट जॉर्ज हे पहिले सरकारी रुग्णालय ठरले आहे. यासाठी १२ मशीन्स रुग्णालयाला उपलब्ध झाल्‍या आहेत. त्यापैकी एक एच आयव्ही, एक एचबीसीजी आणि १० सामान्य रुग्णांसाठी मशीन्स असणार आहेत.
.............................
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून फायदा :
रुग्णांचा खर्च कमी व्हावा, यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत सेवा दिली जाईल. डायलिसीसची गरज असणारा रुग्ण इथे येऊन मोफत सेवा घेऊ शकतो. एका मशीन वर डायलिसिससाठी किमान चार तासांचा कालावधी लागतो. अशा १२ मशीन वर दिवसाला जवळपास ३० ते ३५ रुग्णांचे डायलिसिस केले जाईल.
...................................
या डायलिसिस सुविधेसाठी खास समितीची स्थापना झाली आहे. प्रत्येक रुग्णाला प्राधान्य दिले जाईल. शिवाय, ही तटस्थ समिती असल्याकारणाने रुग्णाची योग्य नोंद ठेवण्यास आणि लक्ष देण्यास मदत होईल. शस्त्रक्रियागृहासह डायलिसिसची सुविधा एकत्र सुरू झाली आहे.
- डॉ. विनायक सावर्डेकर, अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT