मुंबई

बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड यांचा सत्कार

CD

मुंबई (बातमीदार) ः जे. के. मीडिया प्रकाशन संस्था आणि नॅशनल लायब्ररी यांच्या वतीने सुप्रसिद्ध बाल साहित्यकार, कथाकथनकार एकनाथ आव्हाड यांना २०२३ चा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या दिलीपराज प्रकाशन प्रकाशित ‘छंद देई आनंद’ या बालकाव्यसंग्रहाला हा पुरस्‍कार मिळाला आहे. त्यानिमित्ताने सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि साहित्यिका डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते आणि अध्यक्षतेखाली एकनाथ आव्हाड यांचा खास सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम बुधवार, १२ जुलै २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता नॅशनल लायब्ररी वांद्रे सभागृह येथे संपन्न होईल. या वेळी निमंत्रितांच्या बालकाव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात डॉ. सुमन नवलकर, सूर्यकांत मालुसरे, प्रा. पंढरीनाथ रेडकर, चंद्रकांत कवळी, राजेंद्र वाणी, संतोष खाडये, सुयश देशपांडे, विद्या प्रभू आणि दोन्ही संस्था मिळून चालवत असलेल्या बाल कट्ट्याची मुले बालकविता सादर करतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा काळे करतील. या कार्यक्रमास रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन जे. के. मीडियाच्या संचालक ज्योती कपिले आणि नॅशनल लायब्ररीचे प्रमुख कार्यवाहक प्रमोद महाडिक यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Israel Conflict : तेहरान अंधारात ! इस्रायली हल्ल्यानंतर इराणमध्ये वीजपुरवठा ठप्प, मध्यपूर्वेत तणाव शिगेला

Nagpur News: क्रीडा-सांस्कृतिक महोत्सवासाठी जि.प. कडून २० लाखांची तरतूद

Shikhar Shinganapur Yatra: कावडींचा आज मुंगी घाटात थरार! काळगावडे राजेंनी घेतले शंभू महादेवाचे दर्शन, शिखर शिंगणापूर यात्रेत उत्साह..

Sangli Crime : सांगली हादरली! जुन्या वादाचा भयानक शेवट; वाळव्यातील तरुणाचा दगडाने डोके ठेचून निर्घृण खून

Nagpur News: दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या बदलीनंतर सेवाज्येष्ठतेत बदल नाही; उच्च न्यायालय ; जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्याला दिलासा नाकारला

SCROLL FOR NEXT