सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : ईडीने शुक्रवारी माजी आयकर अधिकारी आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांना २६३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. तानाजी मंडल अधिकारी या माजी आयकर अधिकाऱ्याला भूषण पाटील आणि राजेश शेट्टी या दोघांसह अटक करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या मुंबई कार्यालयात नियुक्ती असताना आरोपी तानाजी अधिकारी यांनी २६३ कोटी रुपयांचा टीडीएस परताव्याची बनावट कागदपत्रे तयार केल्याचा आरोप आहे.
ईडीने या प्रकरणी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील ६९.६५ कोटी रुपयांच्या ३२ स्थावर आणि जंगम मालमत्ता जप्त केल्या होत्या. ईडीचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्यूरो सीबीआयने नोंदवलेल्या गुन्ह्यावर आधारित आहे. आरोपी अधिकारी आयकर विभागात २००७ ते २००९ या काळात वरिष्ठ कर सहाय्यक म्हणून कार्यरत असताना, इतरांच्या संगनमताने फसवणूक केल्याचा आरोप आहे. आरोपी अधिकाऱ्याने फसव्या पद्धतीने २६३ कोटी रुपयांपेक्षा जास्त टीडीएस परताव्याची बनावट कागदपत्रे तयार करत ही रक्कम चुकीच्या पद्धतीने आरोपी अधिकाऱ्याचे सहकारी असलेले भूषण पाटील यांच्या मालकीच्या कंपनीत हस्तांतरित केल्याचा आरोप आहे. मुंबईतील न्यायालयाने तिघांना दहा दिवसांची ईडीची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआय अधिक चौकशी करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.