price of chicken, mutton Sakal
मुंबई

Mumbai : आखाडीचा दणका ! गटारीनिमित्त चिकण, मटणाच्या दरात वाढ

मांसाहाराचे सेवण करणाऱ्यांसाठी यंदाचा शेवटचा रविवार आहे.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - आषाढ महिना संपून सोमवारपासून श्रावण अधिकमास सुरू होत आहे. या कालावधीत अनेकजण मांसाहाराचे सेवन करत नाही. त्यामुळे आषाढ अमावस्याच्या दिवशी मांसाहारप्रेमींकडून गटारी साजरी केली जाते.

मांसाहाराचे सेवण करणाऱ्यांसाठी यंदाचा शेवटचा रविवार आहे. त्यामुळे बाजारात मटण, चिकण आणि मासे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची रविवारी गर्दी होणार आहे. तर दुसरीकडे चिकण, मटणाच्या दरात वाढ झाली आहे. तर, हॉटेल चालकांकडूनही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलतीच्या दरात ऑफर लावण्यात आल्या आहेत.

श्रावण महिन्यात बहुतांश कुटुंबांमध्ये मांसाहार केला जात नाही. काही कुटुंबांमध्ये गणपती विसर्जनापर्यंत मासांहाराचे सेवन करत नाहीत. यामुळे आषाढ अमावस्या म्हणजेच गटारी या दिवसाला अधिक महत्त्व दिले जाते. त्यात,रविवारी जर हा दिवस आला तर मांसाहारप्रेमींसाठी सोने पे सुहागाच मानला जातो. रविवारचा दिवस हा कुटुंबातील सदस्यांच्या सुट्टीचा, एकत्र येऊन मजा करण्याचा हक्काचा दिवस असतो.

यंदा या दिवशी रविवार आल्यामुळे मांसाहारप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. काहीजण घरात मांसाहाराचा स्वयंपाक करुन गटारी साजरी करणार आहेत. तर, काहींनी बाहेर हॉटेलात जाऊन गटारी साजरी करण्याचे नियोजन केले आहे.

यादिवशी बाजारात चिकण- मटण खरेदीलाही मोठी गर्दी होत असते. मटण- चिकणला मोठी मागणी असल्यामुळे यादिवशी त्यांच्या दरात वाढ झाल्याचे दिसून येते. चिकण- मटण खरेदीसाठी शनिवारी रात्रीपासूनच चिकण आणि मटणाच्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे दिसून आले.

तर, अनेकांनी आपल्या कुटूंबासोबत किंवा मित्रमैत्रिणींसह शनिवार, रविवार असे दोन दिवस बाहेर जाऊन गटारी साजरी करण्याचा बेत आखला आहे. शहरातील हॉटेल चालकांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी यंदा विविध सवलती देण्यात आल्या आहेत. दहा जणांच्या समुह असल्यास फिश थाली, मटण थाली तसेच कोंबडी वडे थालीवर विशेष अशी सवलत देण्यात आली आहे. शहरातील येऊर या पर्यटनस्थळी नागरिकांनी गटारी साजरी करण्यास गर्दी केली आहे.

मटनात ५० ते १०० रुपयांची वाढ
गटारीच्या दिवशी चिकण- मटणला मोठ्याप्रमाणात मागणी असते. त्यामुळे चिकन आणि मटणच्या दरात वाढ झालीआहे. इतर दिवशी ७०० रुपये प्रति किलोने विक्री केले जाणारे बकऱ्याचे मटण यंदा ७५० ते ८०० रुपये प्रति किलोने विक्री केले जात आहे.

तर, १३० रुपये प्रति किलोने विक्री केली जाणारी ब्रॉयलर कोंबडी १५० ते १६० रुपये प्रति किलोने विक्री केली जात आहे. तर, गावठी कोंबडी ३५० ते ४०० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. गटारीनिमित्त मासळी बाजारातही काहीशी अशीच परिस्थिती होती. पापलेट, कोलंबी, सुरमई या माशांचे दर ही वधारल्याचे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT