मुंबई

उल्हासनगरात सेल्फी विथ खड्डा स्पर्धा

CD

उल्हासनगर, ता. १८ (वार्ताहर) : उल्हासनगर शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नागरिक खड्ड्यांमुळे अक्षरश: त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उल्हासनगरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सेल्फी विथ खड्यांच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही शक्कल सेल्फी विथ खड्ड्यांचे फोटो पाठवणाऱ्या नागरिकांसाठी पारितोषिके जाहीर केली आहेत. प्रथम क्रमांकासाठी २२२२, द्वितीय क्रमांकासाठी ११११ व तृतीय क्रमांकासाठी ५५५ रुपये असे रोख पारितोषिक जाहीर केले आहे. जे नागरिक सेल्फी विथ खड्ड्यांचे फोटो पाठवतील त्यांचे प्रदर्शन आयुक्त अजीज शेख यांच्या दालनासमोर भरवण्यात येणार आहे. तसेच तिथेच प्रथम येणाऱ्या तीन स्पर्धकांना रोख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे मनोज शेलार यांनी सांगितले.

खड्डाविरहित असा एकही रस्ता शहरामध्ये शिल्लक नाही. त्यामुळे रिक्षातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना, रुग्णांना तसेच बाजारपेठेत जात असणाऱ्या नागरिकांना अर्धा तास उशीर होत आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. जसे अमित कुमार यांनी गायलेले एक गाणे आहे ‘ये बंबई शहर हादसों का शहर है’ त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची दुरवस्था बघून ‘ये उल्हासनगर शहर खड्डो का शहर है’ असे म्हणण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी दिली. याबाबत पालिकेचे शहर अभियंता संदीप जाधव यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी २६ जूनपासून खड्डे भरण्याचे काम सुरू आहे; मात्र पावसाचे प्रमाण अधिक असल्याने अडचणी येत आहेत. पावसाने थोडी उसंत घेताच वेगाने खड्डे भरण्यात येणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT