मुंबई

वासिंद रेल्वे स्थानकात पिंपळाच्या झाडाची पूजा

CD

आसनगाव, ता. १८ (बातमीदार) : हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला पवित्र स्थान आहे. दर्श अमावास्येच्या सकाळीच उत्तर भारतीय महिलांनी वासिंद रेल्वे स्थानकातील पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या. हिंदू धर्मात वटपौर्णिमेच्या दिवशी सात जन्म तोच पती मिळावा यासाठी महिला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. उत्तर भारतात मात्र दर्श अमावास्येच्या दिवशी महिला पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात.

पिंपळ हे वृक्ष भारतीय सदाहरित वनांमधील वृक्ष प्रकार आहे. आयुर्वेदात औषधासाठीदेखील याचा उपयोग होतो. वासिंद परिसरात मोठमया प्रमाणात पिंपाळाची झाडे होती, परंतु विकासाच्या नावाखाली ही झाडे कापण्यात आली. वासिंद रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील हे महाकाय वृक्ष जर्जर झाल्याने त्याच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी छाटण्यात आल्या. तरीही वसंत ऋतूत पुन्हा पालवी फुटून प्रवाशांना मोफत प्राणवायू देण्यासाठी सज्ज आहे. महिलांनी धागा गुंडाळून फेऱ्या मारल्या. तसेच पाच फळे व गोडधोड नैवेद्य दाखवून मनोभावे पूजा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway वर ३ तासांचा ‘ब्रेक’! प्रवाशांसाठी मोठा ट्रॅफिक अलर्ट, पर्यायी मार्ग कोणते? प्रवास करण्यापूर्वी नक्की वाचा...

Chhatrapati Sambhajinagar: शेतकऱ्यांच्या डोळ्यांत कांद्याने आणले पाणी; सरासरी ४५० रुपये प्रतिक्विंटल भाव, बाजारात आवक वाढली

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर शहर परिसरात मध्यरात्री कोसळल्या पावसाच्या जोरदार सरी

Chhatrapati Sambhajinagar: सांगा, आम्ही जायचं कुठं?; खुद्द नगरसेविकांचा १० वर्षांनंंतरही महापालिकेत तोच सवाल

IPL 2026, Orange Cap: थेट १७ व्या स्थानावरून अव्वल स्थानी; अभिषेक शर्माचा 'ऑरेंज कॅप'वर कब्जा; टॉप-५ मध्ये कोणते खेळाडू?

SCROLL FOR NEXT