मुंबई

समाजसेवा केंद्रात क्रांतिदिनी आतषबाजी

CD

नवीन पनवेल, ता. १८ (वार्ताहर)ः कामोठे येथील सिडकोने नागरिकांसाठी बांधलेले समाजसेवा केंद्र पाच वर्षांपासून वापराविना बंद आहे. या इमारतीच्या तळमजल्यावर सिडकोचे कार्यालयीन कामकाज सुरू आहे. त्यामुळे डागडुजी करून हे केंद्र सुरू करा; अन्यथा क्रांतिदिनी केंद्राच्या आवारात फटाके फोडण्याचा इशारा एकता सामाजिक संस्थेने सिडकोला दिला आहे.
कामोठेतील नागरिकांना शुभकार्य तसेच सामाजिक उपक्रमांसाठी खासगी सभागृह भाडेतत्त्वावर घ्यावे लागत असल्याने सिडकोकडे समाजसेवा केंद्राची मागणी करण्यात आली होती. कामोठे नोडमधील सेक्टर २१ मध्ये सिडकोने २०१८ साली समाजसेवा केंद्रासाठी दुमजली इमारत बांधली. यासाठी सुमारे ३ कोटी ८० लाख रुपये खर्च केला. तळमजल्यावर ग्रीन रूम, कार्यालय, स्वयंपाकगृह, बहुउद्देशीय सभागृह आहे. पहिल्या मजल्यावर सांस्कृतिक वर्ग, लहान मुलांची कार्यशाळा, डॉक्टरांची खोली आहे. दुसऱ्या मजल्यावर इनडोअर खेळ, पुस्तकालय व कार्यशाळेची व्यवस्था करण्यात आली आहे. २०१९ ला तत्कालीन सिडको अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी घाईघाईने समाजसेवा केंद्राचा लोकार्पण सोहळा उरकला. यावेळी इमारतीला ताबा प्रमाणपत्रही मिळाले नव्हते. सद्यस्थितीत या केंद्राची दुरवस्था झाली असून एकता सामाजिक संस्थेने समाजसेवा केंद्र खुले करण्याची मागणी सातत्याने केली आहे. मात्र, सिडकोचे दुर्लक्ष होत असल्यामुळे लवकरात लवकर हे केंद्र सुरू झाले नाही, तर याच ठिकाणी फटके फोडून निषेध नोंदवला जाईल, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी दिला आहे.
------------------------------------------
कामोठे येथील सेवा केंद्र जवळपास पाच वर्षांपासून बंद आहे. तळमजल्यावर सिडकोने स्वतःचे कार्यालय थाटले आहे असून पहिला मजला धूळ खात आहे; तरी सिडकोने हे केंद्र तत्काळ खुले केले नाही, तर क्रांतिदिनी इमारतीच्या आवारात फटाके फोडणार आहे.
- अमोल शितोळे, अध्यक्ष, एकता सामाजिक संस्था
--------------------------------
सिडको तसेच पालिकेमध्ये होत असलेल्या हस्तांतराच्या प्रक्रियेत या इमारतीचा समावेश आहे. नगररचना विभागातून हस्तांतराची प्रक्रिया सुरू असून लवकरच पालिकेकडे वर्ग होणार आहे.
- श्रीकांत माटे, कार्यकारी अभियंता, सिडको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

अजय देवगणच्या अडचणीत वाढ? मुंबईतील जुहू बंगल्यावर BMC कारवाई, पण नक्की कारण काय?

Nagpur Ganesh Visarjan: ड्रोनमधून ठेवणार गणेश विसर्जनावर नजर;६, हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त; १ हजार ७०२ सार्वजनिक गणेश मंडळांचा समावेश

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीला ऑरेंज अलर्ट; अहेरी दक्षिण भागात मुसळधार पावसाची सुरुवात

बेलापूरमध्ये पारसिक हिलवरून थेट रुळावर कोसळली कार, १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; हार्बर मार्गावरील सेवा विस्कळीत

SCROLL FOR NEXT