मुंबई

कल्याणमध्ये श्रावण महिन्याचे स्वागत

CD

डोंबिवली, ता. १८ (बातमीदार) : अखिल भारतीय साहित्य परिषद कल्याणची मासिक बैठक नमस्कार मंडळ आग्रा रोड कल्याण येथे झाली. या मासिक बैठकीस निमंत्रित कवी दिनेश प्रताप सिंग, संजय द्विवेदी, प्रवीण देशमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली सरत्या आषाढाला निरोप व श्रावणाचे स्वागत याचे औचित्य साधत दीपपूजन करण्यात आले. सर्व उपस्थित कवींनी हा दिवा प्रज्वलित केला. सामूहिक सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सर्व उपस्थित कवी-कवयित्रींनी दिवा या विषयावरील आपापल्या रचना सादर केल्या. वैविध्यपूर्ण, चिंतनशील अशा आशयाच्या प्रगल्भ कवितांचे सादरीकरण उत्तमरीत्या झाले. श्यामसुंदर पांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्याचे महत्त्व तसेच सादर केलेल्या कवितांचा विशेष उल्लेख करत दिव्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता कुलकर्णी यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Protest: दरवाजे उघडू ;राजू शेट्टी यांचा इशारा ;भिलवडी येथे कृष्णा नदीपात्रात सर्वपक्षीय आंदोलन

Loan Waive: शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा साडेआठ हजार जणांची यादी जाहीर; आतापर्यंत ५२ हजार १८४ शेतकरी पात्र

'एक होती चिऊ एक होता काऊ...' डॉ. नेनेंसाठी हे सातारी शैलीत माधुरीचा हटके उखाणा, Video पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Update : खासगी फायनान्स कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची बैठक

Karjat Tree Felling: कर्जत तालुक्यातील वृक्षतोडीचा भीमाशंकर अभयारण्याशी संबंध नाही;वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव यांची माहिती

SCROLL FOR NEXT