मुंबई

ज्येष्ठ महिलेला दिलासा

CD

हर्नियाग्रस्त वृद्धेवर यशस्‍वी उपचार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : जन्मतः नाभीच्या हर्नियाने ग्रस्त ७५ वर्षीय महिलेची असह्य वेदनेतून सुटका झाली आहे. झायनोवा शाल्बी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. वेदना आणि अपचनाची तक्रार असणाऱ्या या महिलेवर हर्निओप्लास्टीद्वारे उपचार केले गेले. जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल यांच्या टीमने हे उपचार केले आहेत.
इंदुमती पुजारी यांना जन्मजात नाभीचा हर्निया होता. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा आजार होता आणि गेली २० वर्षांपासून त्यावर औषधोपचार सुरू होते. त्‍यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला; पण प्रकृतीत सुधारणा होत नव्हती.
जनरल सर्जन डॉ. हेमंत पटेल म्हणाले की, महिलेला जन्मापासूनच पोटात वेदना होत होती; पण हर्नियाचे निदान झाले नव्हते. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतल्यानंतर दुखणे कमी व्हायचे; पण त्यानंतर पुन्हा त्रास जाणवायचा. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर असे आढळून आले की, रुग्णाला नाभीसंबधीत हर्निया असून तो सुमारे ३० सेमी बाय २० सेमी बाय १५ सेमी लांबीचा आणि अतिशय दुर्मिळ आहे. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला इंट्रा ॲबडोमिनल कंपार्टमेंट सिंड्रोमचा धोका उद्भवू शकतो. शस्त्रक्रिया ही गंभीर गुंतागुंतीची असल्याने रुग्ण व कुटुंबीयांचे समुपदेशन केल्यानंतर रुग्णावर हर्नियाप्लास्टी करण्यात आली जी सुमारे ३ तास चालली होती. कोणतीही गुंतागुंत न होता ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

काय आहे हा हर्निया?
नाभीसंबधीचा हर्निया हा बेंबीच्या भागात एक फुगवटा किंवा सूज असल्यासारखा दिसून येतो आणि तो जन्मतःच आढळून येतो. जन्मतः कमी वजन आणि अकाली जन्मलेल्या बाळांमध्ये हा नाभीसंबंधीत हर्निया दिसून येतो.

जन्मतः मला हर्निया असल्यामुळे माझ्या नाभीचे क्षेत्र सर्वसामान्यांपेक्षा मोठे दिसू लागले होते. मी यावर वैद्यकीय मदत घेतली नाही. डॉक्टरांनी माझ्या स्थितीचे अचूक निदान केले आणि योग्य उपचार केले. मी आता तणावमुक्त आयुष्य जगत आहे. माझ्या जीवनाचा दर्जा लक्षणीयरीत्या सुधारला आहे.
- इंदुमती पुजारी, रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe अ‍ॅक्शन मोडवर... पतंजली संबंधित औषधांचा साठा जप्त, आरोग्याशी खेळणाऱ्यांची खैर नाही, राज्यातील सात जिल्ह्यात धडाका!

Donald Trump: फक्त 'या' एका मुद्द्यावरुन अमेरिका-इराणचा सामंजस्य करार रखडला; दोन तासांच्या बैठकीनंतर व्हाईट हाऊसने दिलं स्पष्टीकरण

पीरिअड्स सुरू असतानाही अभिनेत्रीचं पूलमध्ये शूटिंग, अभिनेत्रीने सांगितला पाण्यात 8 तास सीनचा अनुभव, म्हणाली....

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव घसरल्यानंतर पेट्रोल-डिझेल-CNGचे नवे दर जाहीर; मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये दर पाहा

Latest Marathi Update Live: नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT