मुंबई

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ मेळावा संपन्न

CD

वसई, ता. १८ (बातमीदार) : वसई पश्चिम ओमनगर येथील गायत्री मंदिरात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पदाधिकारी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याला वसई, विरार, पालघर, डहाणू, कल्याण, डोंबिवली जिल्हा, मुंबई प्रदेश, येथील पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक जिल्ह्यातील अहवाल यावेळी वाचून दाखवण्यात आला. सभासद नोंदणी, उद्योजक आणि व्हॉट्सॲप ग्रुप याविषयी लोकांच्या कल्पना जाणून घेत नव्या सूचना मांडण्यात आल्या. आत्मनिर्भर भारत या योजनेंतर्गत उद्योजकांसाठी विशेष संधी उपलब्ध आहेत, याचीही माहिती या मेळाव्यात देण्यात आली.

ब्राह्मण संघटन वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवली येथे संमेलन आयोजित केले जाणार आहे, असे डोंबिवली शहराध्यक्ष प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. या मेळाव्याचे नियोजन बाबा जोशी, दीपक पंडित, दिनेश पाठक आणि नंदू पावगी यांनी केले.
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली गेली. या मेळाव्यामध्ये दीपक नाईक यांची मुंबई प्रदेश उपाध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली.

यावेळी बाबा जोशी, नंदू पावगी, सुरेंद्र मोगरे, अमरेंद्र पटवर्धन, दीपक पंडित, प्रकाश व्यास, दिनेश पाठक, रजनी अत्रे, स्मृती आठवले, महारुद्र साठे, संजय वैद्य, प्रसाद कुलकर्णी, रूपक पांडे, अमृता देशपांडे, वृषाली जोशी, शशांक खेर, प्रवीण पाठक यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल ओझा यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Student Endlife : साहिल वाकोडे प्रकरण : तीन दिवसांच्या आंदोलनानंतर आयआयटी बॉम्बे झुकले; विद्यार्थ्यांच्या १८ मागण्या केल्या मान्य

Asia Games 2026: भारताच्या पोरींनी पाकिस्तानला ठेचले; इंडोनेशियाविरुद्ध १७-१ अशा विजयाने हॉकीचे मैदान गाजवले

कसं झालं 'लस्ट- स्टोरीज ३' मधील सिद्धार्थ-अदिती राव हैदरीच्या इंटिमेट सीनचं शूटिंग? म्हणाला, 'दोघांमध्ये उशी...'

Marathi News Live Updates : कॅनडामध्ये विमान अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Satara News: हरवलेली लेक अन् काळजीत आई; शिंगणापूर पोलिसांच्या तत्परतेने पुन्हा घडली मायलेकींची भेट, काळोखात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT