मुंबई

लग्नाला नकार बेतला जिवावर

CD

पनवेल, ता. १८ (वार्ताहर) : लग्नास नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकाराने चाकूने वार करून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवीन पनवेलमध्ये घडली आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून एमजीएम हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू आहेत.
कामोठे येथे राहणारी सविता (२३) नवीन पनवेलमधील एका ब्युटी सेंटरमध्ये कामाला आहे. सविताचे खांदेश्वर भागात राहणाऱ्या भगवान कजबळे (२९) याच्याशी प्रेमसंबंध होते. दोघेही एकाच ब्युटी सेंटरमध्ये काम करत होते; मात्र काही महिन्यांपूर्वीच भगवान याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. तेव्हापासून बेरोजगार असलेल्या भगवान तसेच सवितामध्ये काही ना काही कारणास्तव खटके उडत होते. रविवारी (ता. १६) सविता नेहमीप्रमाणे कामावर गेली होती. दुपारी अडीचच्या सुमारास दुकानाचा मालक जेवण्यासाठी गेल्यानंतर दुकानात एकटीच असलेल्या सविताला भेटण्यासाठी भगवान दुकानावर गेला होता. त्या वेळी दोघांमध्ये वाद सुरू असतानाच भगवानने सविताच्या हातावर, मानेवर, गळ्यावर चाकूने वार करून घटनास्थळावरून पलायन केले.
---------------------------------------
हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी असलेल्या सविताने त्याच अवस्थेत शेजारच्या दुकानात धाव घेतली. त्यानंतर दुकानदारांनी तिला एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांनी आरोपी भगवान कजबळेविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सविताने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे भगवानने हा हल्ला केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Alegaon Murum Mining: आळेगाव पागा मुरूम उत्खनन प्रकरण: पंचनाम्यातील आकडे संशयास्पद, पर्यावरणप्रेमींची सखोल चौकशीची मागणी

Pitru Paksha 2026 : पितृपक्षात श्राद्धाचं जेवण कसं असावं? शास्त्रानुसार काय वाढावं आणि काय टाळावं जाणून घ्या

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

SCROLL FOR NEXT