मुंबई

अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

CD

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : अंबरनाथमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह, रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत नुकताच शासन निर्णय जाहीर झाला असून तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर उपलब्ध निधीतून लवकरच वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या कामाला गती मिळणार आहे. हे रुग्णालय २६ एकर जागेत साकारले जाणार आहे.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय याच वर्षी उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अंबरनाथसह राज्यतील नऊ शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. अंबरनाथ तालुक्यात आगामी काळातील वैद्यकीय उपचार आणि शिक्षणाची गरज ओळखत अंबरनाथ पूर्वेतील आरक्षण क्रमांक १०८ अ, या २६ एकर जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय उभारण्यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर आमदार डॉ. किणीकर यांच्या प्रयत्नांना यश मिळून राज्यभरातील नऊ वैद्यकीय महाविद्यालयांसह ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहराचा समावेश करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाने वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास मंजुरी दिल्यानंतर नुकताच याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यात मोठा वाटा आहे. वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामुळे तालुक्यासह ग्रामीण भागातील गरजु रुग्णांना वेळेत अत्याधुनिक उपचार मिळण्यासह वैद्यकीय क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांच्याही शिक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. अंबरनाथमध्ये विविध रोजगाराच्या संधी मिळणार असून अंबरनाथ शहराची वैद्यकीय क्षेत्रात जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण होणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. किणीकर यांनी केले.
...
शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश
अंबरनाथच्या नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तसेच ३०० विद्यार्थ्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि ४३० खाटांची व्यवस्था असलेली रुग्णालयाची इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती आमदार डॉ. किणीकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Betting : ऑनलाइन बेटिंगमुळे कर्ज झाल्याने संपविले जीवन; प्रथमेशच्या लेटर नोटमधील माहिती

Palghar News : रुग्णालयातील राड्याला न्यायालयाचा दणका! राहुल घरतची कोठडी वाढली, तिघांचा अटकपूर्व जामीनही फेटाळला आणि अटक वॉरंटची मागणी

Marathi News Live Updates : हडपसरमधील माळवाडीत आठ घरे आगीत भस्मसात; एका घरात सिलेंडरचा स्फोट

Shirur Maratha reservation protest: शिरूरमध्ये मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा; मराठा आरक्षणासाठी पुणे–नगर मार्गावर रास्ता रोको

Takli Rajeray Crime : टाकळी राजेराय पोलिसांची धडक कार्यवाही; दोनशे किलो गोमांस जप्त

SCROLL FOR NEXT