मुंबई

बुडालेल्या सुरक्षा रक्षकाचा मृतदेह मिळाला

CD

भाईंदर, ता. १८ (बातमीदार) : महाराष्ट्र सुरक्षा दलात काम करणारा सुरक्षारक्षक रविवारी (ता. १६) सायंकाळी भाईंदर खाडीत बुडाला होता. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी (ता. १८) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह भाईंदर पश्चिम खाडीकिनाऱ्याला सापडला आहे. खाडीच्या पाण्यात वाहून आलेला मृतदेह मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने बाहेर आणला. रमेश सर्जेराव पाटील (३४) हा महाराष्ट्र सुरक्षा दलात काम करणारा सुरक्षारक्षक रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास भाईंदर पश्चिम येथील खाडीत उतरला होता. ओहोटी असल्यामुळे पाण्यात जाऊ नको असे आसपासच्या लोकांनी त्याला सांगितले; मात्र आपल्याला पोहता येते असे सांगून त्याने पाण्यात उडी मारली. काही अंतरापर्यंत तो पोहत गेला; मात्र नंतर अचानक तो पाण्यात दिसेनासा झाला होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीच्या साह्याने सुमारे तासभर त्याचा पाण्यात शोध घेतला; परंतु त्याचा शोध लागला नव्हता. अखेर मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह भाईंदर पश्चिम खाडीकिनारी आढळून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीला राहुल गांधींकडून 'ही' अपेक्षा; वाढदिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना

लोन घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ७३० पेक्षा कमी CIBIL स्कोअर? कर्ज मिळवणे कठीण होणार; RBI च्या नव्या नियमांचा परिणाम

अवघ्या 3 मिनिटांत घडला चमत्कार! श्वास थांबला, हृदय बंद पडलं... पण डॉक्टरांच्या तत्परतेने चिमुकलीला नवजीवन मिळालं

Yavatmal News : शिंदे सेनेकडून खासदार देशमुखांच्या स्वागताचे फलक झळकले; खासदार संजय देशमुखांच्या बंडखोरीवर शिक्कामोर्तब

ODI World Cup: 2027 विश्वचषकात रोहित-विराट खेळणार? BCCI ने स्पष्टच सांगितलं, विशेष सवलत मिळणार नाही!

SCROLL FOR NEXT