मुंबई

बेस्टच्या स्वमालकीच्या बसेस घेण्याचा विचार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः बेस्ट बसची संख्या कमी होत असली, तरी प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह मालकीच्या बस खरेदी करण्याचा बेस्टचा विचार सुरू असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४,५०० बसेस होत्या. मात्र हा ताफा आता ३,१०० वर आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह बेस्टच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. बस ताफ्यात वाढ करताना अधिकाधिक बसेस बेस्टच्या मालकीच्या असतील यावर भर देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
बेस्टला बस पुरवठा करणारे सध्या सात विविध कंत्राटदार आहेत. यापुढेही विविध कंत्राटदारांमार्फत बस ताफ्यात येणार आहेत; मात्र या कंत्राटदारांचे विविध अनुभव बघता, या कंत्राटदारावर पूर्णपणे विसंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या बसेस व स्वमालकीच्या बस यात समतोल राहावा म्हणून लवकरच स्वमालकीच्या बस घेण्यासाठी विचार सुरू असून लवकरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.
------------------------
चलो अॅपचा आढावा
चलो अॅप प्रवाशांच्या पसंतीस उतरले असून बेस्ट उपक्रमाला या अॅपमुळे कुठलेही उत्पन्न मिळत नाही; तरीही चलो ॲपला एवढे प्रोत्साहन का दिले जाते, याचा अभ्यास बेस्ट करणार असल्याचे उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI व्यवहारांवर MDR चार्ज लावण्याच्या निर्णयानंतर या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी! कारण काय?

गोकुळच्या 25 जागांसाठी रणसंग्राम! महायुतीत धुसफूस, मुश्रीफांचा भाजपला इशारा?

गेल्यावेळी मुंबईत धिंगाणा घातलात, घाण केलीत; लोकांचे सण खराब केले, हिंदुस्थानी भाऊची जरांगेंवर वादग्रस्त शब्दात टीका

Short Circuit Suspected Behind Fire : आनंदाच्या वातावरणाला आगीचे ग्रहण : शॉर्टसर्किटमुळे घराला आग; दोन मुलींसह आई आणि चुलतीचा मृत्यू

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या डिफेंडर गाडीची पोलिसांकडून कसून तपासणी; तपासणी करण्यामागचे कारण काय?

SCROLL FOR NEXT