मुंबई

महिलांचे आरोग्य बळकट होणार

CD

नेरूळ, ता. १८ (बातमीदार) : नवी मुंबई महापालिकेची लवकरच महिलांसाठी पहिली व्यायामशाळा सुरू होणार आहे. बेलापूर सेक्टर २० मध्ये असलेल्या कम्युनिटी सेंटरच्या तिसऱ्या मजल्यावर ही व्यायामशाळा असून यासाठी पालिकेकडून सर्व आवश्यक पायाभूत सुविधा आणि उपकरणे उभारण्यात येत आहेत.
प्रशासनाने ९४ लाख किमतीची उपकरणे खरेदी करण्यासाठी निविदा मागवली आहे. माजी नगरसेविका व नवी मुंबई काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी ही संकल्पना महिलांना डोळ्यासमोर ठेवून मांडली होती. यासाठी कायम पाठपुरावाही केला होता. अखेर त्याला यश आले आहे. कम्युनिटी सेंटरचा तिसरा मजला पूर्वी एका खासगी जिमला भाड्याने दिला होता. आता बऱ्याच काळापासून तो रिक्त आहे. तेच ठिकाण महिलांसाठी आरोग्य केंद्र म्हणून पालिकेद्वारे विकसित केले जाणार आहे. व्यायामशाळेची संकल्पना प्रभाग क्रमांक १०६ च्या माजी नगरसेविका पूनम पाटील यांनी मांडली होती. त्या म्हणाल्या, स्त्रिया आपल्या कुटुंबाच्या गरजा जपताना आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांच्यासाठी फार कमी व्यायामशाळा आहेत. खर्च अधिक असल्याने त्या व्यायामशाळा वापरण्यास नाकारतात. याबाबत महिलांशी बोलताना अनेक बाबी समोर आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईत मोठा अनर्थ टळला! मोटरमनच्या क्षणभराच्या चुकेने प्रवाशांचा थरकाप, भांडूप स्थानक आलं तरी लोकल थांबली नाही, काय घडलं?

Gudipadwa Holiday: गुढीपाडव्याला बँका आणि शेअर बाजार बंद की सुरू? जाणून घ्या RBI आणि NSE ची अधिकृत माहिती

Latest Marathi News Live Update : अंबाबाई मंदिर गाभारा संवर्धन पूर्ण; आजपासून दर्शन सुरू

पुण्याची बातच न्यारी! मृणाल ठाकूरने पुण्यात येताच केली 'ही' गोष्ट, खास मराठी पोस्ट करत म्हणाली... 'पुण्यात आलो आणि...'

Indore Fire Accident : इमारतीला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू; इलेक्ट्रिक कार चार्जिंग करताना शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना

SCROLL FOR NEXT