मुंबई

बंदी झुगारून पर्यटक धबधब्यावर

CD

खारघर, ता. १८ (बातमीदार) : दुर्घटना टाळण्यासाठी खारघर पोलिसांनी धबधबा परिसरात जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. मात्र, काही पर्यटक सोमवारी (ता. १७) बंदी झुगारत धबधब्यात मनसोक्‍त भिजण्याचा आनंद घेताना दिसून आले.
खारघर येथील तळोजा मध्यवर्ती कारागृहासमोरील तलावात २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. मागील वर्षीही जुलै महिन्यात खारघर डोंगरावर झालेल्या मुसळधार पावसामुळे नाला दुथडी वाहू लागल्याने ७८ महिला, पाच मुले आणि २० पुरुष अडकून पडले होते. असे जवळपास शंभरहून अधिक पर्यटक अडकले होते. या वेळी अग्निशमन जवानांनी नाल्यावर ५० फूट लांब सीडी आणि दोरखंड बांधून सर्व पर्यटकांची सुटका केली. पुन्हा असे प्रकार होवू नये, यासाठी खारघर पोलिसांनी धबधबा, तलाव आदी ठिकाणी जमावबंदीचे आदेश लागू करून पोहण्यास मनाई असे फलक लावले आहे. असे असतानाही सोमवारी पर्यटक बंदी झुगारून सेक्टर पाच येथील धबधब्यावर आनंद घेताना दिसून आले. विशेष म्हणजे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई गोवा मार्गावर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी, वाहनांच्या ८ ते ९ किमी रांगा; प्रवाशी संतप्त

Aditi Swami Success Story : अर्जुन पुरस्कार विजेत्या आदितीचा डंका! मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारीपदी वर्णी; ओजस देवतळे, प्रथमेश फुगे यांचीही नियुक्ती

Koyna Dam Bridge Update : छत्रपती शिवाजी महाराज जलाशयावरील बहुचर्चित आहिर-तापोळा केबल स्टे ब्रिज कधी खुला होणार? 95 टक्के काम पूर्ण, T & T कंपनीनं काय सांगितलं?

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर

WOMEN'S ASIA CUP 2026: फायनलआधी टीम इंडियाची फिल्डिंग ठरतेय डोकेदुखी! ४ झेल सुटले, दीप्ती शर्माने सांगितलं ‘या’ सामन्यात चूक होणार नाही

SCROLL FOR NEXT