मुंबई

बससेवेअभावी नागरिकांचे हाल

CD

मोखाडा, ता. १८ (बातमीदार) : सरकारने महिलांना अर्धे भाडे, वृद्ध आणि विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास या सुविधा देऊ केल्या आहेत; मात्र खोडाळा ते कसारा आणि खोडाळा ते घोटी या मार्गावर अत्यल्प बससेवा सुरू आहेत. पूर्वी या मार्गावर मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकावर येणाऱ्या लोकलच्या वेळेनुसार बससेवा सुरू होती. तसेच घोटीला जाणाऱ्या गाड्यांची संख्या जास्त होती; मात्र त्या सेवा बंद झाल्या आहेत. त्या बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी हितवर्धक संघाने केली आहे.

जव्हार, मोखाडा तालुक्यांत शहापूर, कल्याण, ठाणे आणि मुंबई या भागातून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठी आहे. तसेच या भागातून शहरात जाणाऱ्या कामगारांची संख्या जास्त आहे. त्यासाठी मध्य रेल्वेचे कसारा बसस्थानक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. तेथून या दोन्ही तालुक्यांत येण्यासाठी केवळ तीन बसफेऱ्या आहेत. त्यामुळे चाकरमानी आणि कामगारांना वेळेत बस नसल्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना जादा भाडे देऊन प्रवास करावा लागतो.

प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, तसेच बससेवेचा लाभ मिळावा, म्हणून प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी जव्हार आगार व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खासगी वाहनांना लाभ
उत्तर महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी या ठिकाणी नागरिकांना बाजारहाट करण्यासाठी जावे लागते. तसेच मोखाडा तालुक्यात मोठा दवाखाना नाही. त्यामुळे रुग्णांना उपचारांसाठी नियमित घोटी आणि इगतपुरी येथे जावे लागते. तसेच घोटी, इगतपुरी आणि कसारा येथे शाळा-महाविद्यालयांत जाणारे विद्यार्थीदेखील आहेत; मात्र कसारा आणि घोटी मार्गावर बसफेऱ्यांची संख्या कमी असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांतून जादा भाडे देऊन प्रवास करावा लागतो आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Irani Cup 2026: रिषभ पंतच्या नेतृत्वातील संघ ठरला चॅम्पियन! फायनलमध्ये रणजी ट्रॉफी विजेत्यांना केलं पराभूत

भाकरीसोबत तोंडाला पाणी आणणारी गोळ्याची आमटी; पाहा खानदेशी पद्धतीची रेसिपी; GOLYACHI AAMTI RECIPE

Latest Marathi News Live Update : मालेगाव मध्ये तापमान 38.2 अंशावर पोहचले

France Student Protests : फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण; ४ हजार जणांना अटक, २०० जण जखमी

वय वाढण्याआधीच मानेवर रेषा दिसू लागल्यात? या टेक लाइन्स घालवण्यासाठी जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितले ४ सोपे व्यायाम

SCROLL FOR NEXT