मुंबई

बारसू प्रकल्प हद्दपार करणार

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ ः कोकण उद्ध्वस्त करणारा बारसू येथे प्रस्तावित असलेला विनाशकारी रिफायनरी प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, तो कायमचा हद्दपार करणार, असा निर्धार आज आझाद मैदानातील आंदोलनात बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनतेने केला. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदी राजकीय पक्षांनी बारसू रिफायनरीच्या विरोधात केलेल्या या आंदोलनाला पाठिंबा दिला.
बारसू-सोलगाव पंचक्रोशी रिफायनरीविरोधी संघर्ष समिती आणि बारसू रिफायनरीविरोधी राज्यव्यापी लढा समिती यांनी आज बारसू प्रकल्पाच्या विरोधात आज आझाद मैदानात एल्गार पुकारला होता. विनाशकारी रिफायनरी रद्द करा, कोकण वाचवा अशा घोषणा देत, आझाद मैदान बारसू-सोलगाव पंचक्रोशीतील जनतेने दणाणून सोडले. या आंदोलनाला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पाठिंबा दिला. कोकण उद्ध्वस्त करणारा बारसू प्रकल्प आम्ही कदापीही होऊ देणार नाही. काँग्रेसचा या स्थानिकांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा राहील, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली. शिवसेना नेते विनायक राऊत यांनीही आंदोलनाला पाठिंबा दिला. ते म्हणाले की, हजारो वर्षांची आपली परंपरा असलेले कातळशिल्प येथे आहे. ती कोकणची ठेव आहे. ते जतन केले पाहिजे. तो वारसा संपवायला निघालेल्यांना कोकणी माणूस माफ करणार नाही, रिफायनरीमधून नोकऱ्या मिळणार नाहीत. असलेल्या व्यवसायांचा विध्वंस होईल, असे सांगत शिवसेनाचा या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही राऊत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही आंदोलनास पाठिंबा दिला.
...
...तर राज्यव्यापी आंदोलन
अभिजित चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चालू केलेल्या आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी उल्का महाजन, सत्यजित चव्हाण, प्रकाश रेड्डी, नितीन जठार, दीपक जोशी आदी नेते सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील प्रागतिक पक्ष आणि संघटनांची व्यापक आघाडी या आंदोलनात सहभागी होती. या आंदोलनाने सरकारचे रिफानरीसंबंधांतील धोरणात बदल न झाल्यास हे आंदोलन राज्यव्यापी करण्यात येणार आहे, असे सत्यजित चव्हाण यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : सोलापुरातून तुळजापूर-धाराशिवला पाणी देण्याला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

SCROLL FOR NEXT