मुंबई

एसटीच्या परिपत्रकात सुधारणा

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : क्षयरोग, कॅन्सर आणि कुष्ठरुग्णांना ४५ वर्षांपूर्वी एसटीच्या साध्या बसमध्ये निःशुल्क प्रवासाची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस, हिमोफेलियाग्रस्त रुग्णांसाठी सेवाभावी संस्थांनी एसटीतून उपचाराला जाणाऱ्या रुग्णांसाठी सवलत मागितली होती. त्याप्रमाणे २०१८ मध्ये साध्या बसमध्ये ही सवलत लागू केली. दरम्यान, परिपत्रक काढताना निमआराम, आराम बसमध्येही सुविधा असल्याचा चुकीने उल्लेख आल्याने आणि प्रत्यक्षात निमआराम, आराम बसमध्ये सवलत मिळत नसल्याने सेवाभावी संस्थांच्या तक्रारीनंतर आता एसटी महामंडळाने आपली चूक दुरुस्त केली आहे.

एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने आता नव्याने परिपत्रक काढले असून क्षयरोग, कॅन्सर आणि कुष्ठरुग्णांप्रमाणे सिकलसेल, एचआयव्ही बाधित, डायलिसिस, हिमोफेलियाग्रस्त यांनाही साध्या बस मधूनच निःशुल्क प्रवासाची सवलत लागू असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे; तर नवीन परिपत्रकातून निमआराम आणि आराम बसचा उल्लेख काढून टाकण्यात आला आहे. २०१८ च्या चुकीच्या परिपत्रकामुळे रुग्णांच्या सामजिक संस्थांनी एसटी महामंडळ प्रशासनाकडे इतरही बसमधून प्रवासी सवलत दिली जात नाही अशा तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर ही चूक लक्षात आली असल्याचे वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सांगितले आहे.

-----------
रुग्णांना आधीच त्यांच्या उपचारासाठी वेळोवेळी रुग्णालयात जावे लागते. एसटी प्रवास करणाऱ्या रुग्णांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असते. त्यामुळे प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसशिवाय या रुग्णांना पर्याय नाही. सध्या ग्रामीण भागातसुद्धा साध्या बसच्या फेऱ्या कमी करून, शिवशाही, हिरकणी बसच्या फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. जरी गेल्या ४५ वर्षांपासून साध्या बसमधूनच निःशुल्क प्रवासाची सुविधा दिली जात असली, तरी रुग्णांच्या परिस्थितीचा विचार करून ही सवलत सर्व प्रकारच्या बसमधून द्यावी.
- गौरव जाधव, प्रहार संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT