मुंबई

एटीएम व्हॅनमधील रोकड लुटून चालकाचे पलायन

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : कांदिवली पूर्व परिसरात एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेली रक्कम घेऊन चालकाने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी चालकाने २२ लाख ४३ हजार रुपयांची रोकड पळवली असून याप्रकरणी समतानगर पोलिस अधिक तपास करीत आहेत. आरोपी चालक सागर सोनवणे याचा शोध पोलिस घेत आहेत.

या प्रकरणी तक्रारदार राजाराम घाडीगावकर एका खासगी कंपनीत कार्यरत आहेत. त्यांची कंपनी विविध बँकांकडून रोख रक्कम घेऊन ती विविध बँकांच्या एटीएम मशीन भरणा करण्याचे काम करते. घाडीगावकर नेहमीप्रमाणे गत शनिवारी (ता. १५) साडेतीन कोटी रुपयांची रोकड घेऊन बँकेतून निघाले होते. या वेळी त्यांच्यासोबत चालकासह दोन सहकारी होते. इतर एटीएम मशीनमध्ये रक्कम भरल्यानंतर कांदिवली येथील ठाकूर संकुलातील एटीएम मशीनमधून त्यांनी २२ लाख ४३ हजार रुपये घेतले. त्यानंतर ते गाडी घेऊन आकुर्ली रोड येथे पैसे भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी चालकही व्हॅनमध्येच होता. घाडीगावकर परत आले असता चालकाने रोकड घेऊन पलायन केल्याचे त्यांच्या लक्षात आले. घाडीगावकर यांनी चालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला; पण त्याचा मोबाईल बंद होता. अखेर याप्रकरणी त्यांनी समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी चालक सागर सोनावणेविरोधात गुन्हा दाखल करत सीसी टीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT