मुंबई

रेल्वे प्रवाशांना मिळणार माफक दरात खाद्यपदार्थ!

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : रेल्वे प्रवाशांना माफक दरात आणि चांगल्या दर्जाचे जेवण मिळावे, यासाठी रेल्वे प्रशासन आणि आयआरसीटीसीद्वारे संयुक्तपणे पुढाकार घेण्यात आला आहे. यासाठी भारतीय रेल्वेच्या ६४ स्थानकांवर लांब पल्ल्यांच्या गाड्यांच्या सामान्य श्रेणीच्या डब्यांजवळ नाश्ता, जेवण आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा (ता. १९) बुधवारपासून सुरू करण्यात आली. या उपक्रमाला सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यातून प्रवास करताना प्रवाशांना खाण्यापिण्याच्या अनेक अडचणी उद्भवतात. काही प्रवासी आपल्यासोबत एकावेळचे जेवण अथवा नाश्ता घेऊन जातात. मात्र उर्वरित लांब अंतराच्या प्रवासात त्यांची गैरसोय होते. प्रवाशांच्या या अडचणी लक्षात घेत माफक दरात आणि चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ पुरविण्याच्या दृष्टीने मध्य आणि पश्चिम रेल्वेने पुढाकार घेतला आहे. यामध्ये मेल, एक्स्प्रेसच्या सामान्य श्रेणीच्या डब्यांजवळ नाश्ता, जेवण आणि पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी रिफ्रेशमेंट युनिट्स आणि जनआहारच्या योजना लागू करण्याचा सल्ला भारतीय रेल्वेकडून आयआरसीटीसीला देण्यात आला आहे. ही सुविधा सहा महिने उपलब्ध असणार आहे.

या स्थानकांवर सुविधा सुरू
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनल, नागपूर, भुसावळ, पुणे, मनमाड, खांडवा; तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल, राजकोट, सुरेंद्रनगर या स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT