मुंबई

वाड्यातील कंपनी बंद करण्याचे आदेश

CD

वाडा, ता. २२ (बातमीदार) : तालुक्यातील आंबिस्ते येथील ग्रामस्थ वाडा तहसील कार्यालयासमोर कंपनीविरोधात गुरुवारी (ता. २०) उपोषणाला बसले होते. या आंदोलनाची दखल आमदार संजय केळकर यांनी घेत विधानसभेत हा विषय उपस्थित केला होता. या प्रकरणाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेत जी. के. फाउंडर्स कंपनीवर कारवाई करत नोटिशीद्वारे कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

वाडा तहसील कार्यालयासमोर आंबिस्ते ग्रामस्थांचे उपोषण सुरू झाल्यावर भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी हा विषय आमदार संजय केळकर यांच्या दूरध्वनीवरून कानावर घातला होता. केळकर यांनी हा विषय अधिवेशनात उपस्थित करून ग्रामस्थांना न्याय मिळवून दिला. तालुक्यातील आंबिस्ते गावामध्ये जे. के. फाउंडर्स कंपनीत अॅल्युमिनियमवर प्रक्रिया करून विविध वस्तू बनवल्या जातात. त्यातून होणारे प्रदूषण हे खूप घातक असल्याने शेत पीक, फळझाडे आणि नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या कंपनीविरोधात दहा वर्षे संघर्षाची लढाई सुरू असून अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दखल घेत कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT