मुंबई

मरिन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या निविदेत स्पर्धा

CD

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. २२ : मुंबईतील नागरी बांधकाम योजनेंतर्गत ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह या भुयारी रस्त्यासाठी ‘एल अँड टी’ने सर्वात कमी बोली लावली आहे. ऑरेंज गेट ते मरिन ड्राइव्ह हे अंतर कमी वेळेत पार करता यावे, यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. ३.८ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात दुहेरी बोगदे असतील.

पूर्व द्रुतगती मार्गावरून कोस्टल रोडला जोडण्यासाठी आणि जलद वाहतुकीसाठी एमएमआरडीएने हा भुयारी मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रत्येक बोगदा ३.२ मीटर रुंदीचा असेल. या मार्गाचा वेग ८० किलोमीटर प्रतितास असेल. प्रकल्प आराखड्यानुसार, रस्त्याची मार्गरेषा पूर्व मुक्त मार्गाच्या ऑरेंज गेटपासून चिंचबंदर रेल्वे ओलांडणी पुलाच्या पूर्वेकडून सुरू होते. तेथून सरदार वल्लभभाई पटेल या रस्त्यावरून हार्बर व मध्य रेल्वेमार्ग, मोहम्मद अली रस्ता, पठ्ठे बापूराव मार्ग (अलंकार सिनेमा चौक), राजा राममोहन रॉय मार्ग (हरकिसन नरोत्तमदास हॉस्पिटल), तसेच विठ्ठलभाई पटेल रस्ता, लॅमिंग्टन रोड, न्यू क्वीन रस्ता, पश्चिम रेल्वेवरील वरेकर रेल्वे पूल आदी रस्ते ओलांडून नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग (मरिन ड्राईव्ह) येथे सागरी किनारा मार्गाच्या दरम्यान प्रस्तावित आहे.

एमएमआरडीएला या प्रकल्पासाठी अंदाजे ६,५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. २० जुलै रोजी या प्रकल्पासाठी आर्थिक निविदा उघडण्यात आल्या. यामध्ये एल अँड टी आणि जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट्स यांचा निविदेत समावेश आहे. त्यांनी अनुक्रमे ७,७६५ कोटी आणि ८,५८९ कोटी रुपये इतकी बोली लावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT