मुंबई

निवाराशेडअभावी प्रवाशांचे हाल

CD

नेरूळ, ता. २६ (बातमीदार) : नवी मुंबईत सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यात नेरूळमधील बस थांब्यावर निवारा शेड नसल्याने प्रवाशांना पावसात भिजत बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. येथील बस थांब्यांवर नवी मुंबई परिवहन विभागाने निवारा शेड उभारून गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
नवी मुंबई पालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा कार्यरत आहे. ठिकठिकाणी परिवहन उपक्रमाने प्रवाशांसाठी बस निवारा शेडची उभारणी केली आहे. नेरूळमधील सेक्टर २८ येथील श्री गणेश सोसायटीसमोरील थांब्यावरून बस क्रमांक १८, २० २२ आणि १४; तसेच बेस्ट बस क्रमांक ५०२ सातत्याने धावत असते. मात्र, कित्येक वर्षांपासून या ठिकाणी निवारा शेड उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अशीच परिस्थिती बाणचोली मैदान, नेरूळ गाव येथील आहे. त्या ठिकाणीही शेड नसल्याने प्रवाशांना जवळील दुकानाचा आधार घ्यावा लागत आहे. नेरूळ सेक्टर १० येथील सहकार बाजार बस थांबा येथेही निवारा शेड नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्यामुळे पालिकेच्या परिवहन विभागाने लवकरात लवकर संबंधित विभागात निवारा शेड उभारावेत, अशी मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत आहे.

नेरूळ सेक्टर १० येथील सारसोळे बस डेपोसमोरील थांब्यांवर निवारा शेड नाही. पावसाळ्यात प्रवाशांना भिजत उभे राहावे लागत आहे. बऱ्याचदा येथून लहान मुलेही प्रवास करतात.
- पांडुरंग कांबळे, ज्येष्ठ नागरिक

नवी मुंबई पालिका परिवहन विभागाकडून बस निवारण बांधणीचे काम सुरूच असते. नेरूळ येथील बस थांब्यांची पाहणी करून योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील.
- योगेश कडूसकर, व्यवस्थापक, नवी मुंबई परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT