मुंबई

ठाणे नगर पोलिसांकडून मुद्देमाल हस्तगत

CD

ठाणे, ता. २६ (बातमीदार) : विविध गुन्ह्यांत चोरट्यांनी किंवा गहाळ झालेल्या सोन्याचा मुद्देमाल ठाणे नगर पोलिसांनी हस्तगत केला आहे. तो मुद्देमाल तक्रारदारांना परत करण्यात येत आहे. यासाठी तक्रारदारांनी ठाणे नगर पोलिसांशी संपर्क साधावा, तसेच आपला ऐवज घेऊन जावे, असे आवाहन ठाणे नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी केले आहे.

ठाणे नगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ५ सोन्याची लगड, एक कोल्हापुरी साज, २ चांदीच्या अंगठ्या, ३ सोन्याच्या अंगठ्या (११ ग्रॅम) असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अनेक महिन्यांपासून सदरचा मुद्देमाल हा पोलिस ठाण्यात जमा आहे. फिर्यादींनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी चौकशी केली. मात्र फिर्यादीने तक्रारीत नमूद केलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात कोणी आढळून आले नाहीत. या किमती मुद्देमालाची निर्गती करणे गरजेचे असल्याने फिर्यादींनी तक्रारीची प्रत, आधार कार्ड या कागदपत्रांसह तातडीने पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, अन्यथा हा मुद्देमाल सरकारजमा करण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Census: महाराष्ट्रात जनगणना कधी सुरू होणार? हा कार्यक्रम किती काळ चालणार? तारखा आल्या समोर...

Video : स्वानंदी समरच्या प्रेमकथेला सुरुवात ! समरला मिळालं रोमँटिक सरप्राईज; प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

माईक हिसकावला आणि स्टेजवरुन हकललं, प्रसिद्ध कॉमेडीयन सुनील पालचा भर कार्यक्रमात अपमान, Viral Video

Central Railway: मध्य रेल्वेवर गोंधळाची परिस्थिती, रुळावर पडून प्रवाशाचा मृत्यू, लोकल सेवा खोळंबली

SCROLL FOR NEXT