मुंबई

मोखाड्यात रॅली काढून मणिपूर घटनेचा निषेध

CD

मोखाडा, ता. २६ (बातमीदार) : मणिपूरमध्ये आदिवासी महिलेची विवस्त्र धिंड काढून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याचा देशभरातून निषेध केला जात आहे. त्याचे पडसाद मोखाडा तालुक्यातही उमटले आहेत. मोखाडा आणि खोडाळा या दोन्ही बाजारपेठेतून आदिवासी संघटनांनी मोर्चा काढून निषेध नोंदवला. खोडाळा येथे आदिवासी विकास हक्क परिषद आणि सर्व आदिवासी संघटना यांच्याकडून खोडाळा शहरातून रॅली काढून काळे झेंडे घेत पोलिसांना निषेधाचे निवेदन देण्यात आले. या रॅलीचे नेतृत्व उपसभापती प्रदीप वाघ, जिल्हा परिषद सदस्य कुसुम झोले, मिलिंद झोले, एकनाथ झुगरे, विष्णू हमरे, तसेच खोडाळा भागातील सरपंच, सदस्य आणि आदिवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोखाडा बाजारपेठेत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या नेतृत्वाखाली शहरातून तहसीलदार कार्यालयापर्यंत पायी रॅली काढत निषेध केला. या वेळी तहसीलदार मयूर खेंगले यांना निषेधाचे पत्र देण्यात आले. तालुक्यातील बहुतांश सरपंच, विविध पक्षांचे पदाधिकारी आणि महिलांचा मोठा सहभाग होता. मणिपूर आणि सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील घटना भारतीयांसाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे आदिवासी दिन यंदा उत्साहात करण्याऐवजी साध्या पद्धतीने तो साजरा करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Padma Bhushan : 'ज्ञानेश कुमार यांना पद्मविभूषण पुरस्कार द्या'; भाजप प्रदेशाध्यक्षांनी केली मागणी

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

Latest Marathi News Live Update : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD कडून अलर्ट जारी

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

SCROLL FOR NEXT