मुंबई

जिल्हास्तरीय महोत्सवात रानभाज्यांचा आस्वाद

CD

उरण, ता. २६ (बातमीदार) : प्रकल्प संचालक आत्मा व जिल्हा कृषी विभागाच्या वतीने पहिल्यांदाच जिल्हास्तरीय रानभाज्या महोत्सव मंगळवारी (ता. २५) उरणमध्ये भरवण्यात आला होता. हा महोत्सव तेरापंथ हॉल, महाराष्ट्र भूषण डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा, बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल सभागृह, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह या चार ठिकाणी होता. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्वला बाणखेले यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्‍घाटन झाले.
उरण, खालापूर, कर्जत, पेण, अलिबाग व मुरूड या तालुक्यांतून जवळपास ७० शेतकऱ्यांनी रानभाज्या महोत्सवात सहभाग घेतला होता. उरण तालुक्यातील अंदाजे २०० शेतकरी आणि उरणच्या शहरी भागातील ग्राहक भाज्या खरेदी करण्यासाठी आले होते. काही आदिवासी शेतकऱ्यांनी रानभाज्या बनवण्याच्या विविध पद्धतीची माहिती करून दिली. महिला गटांनी पाककृती प्रदर्शन भरवले होते. उपस्थित नागरिक, शेतकऱ्यांनी बनवलेल्या विविध रानभाज्यांचा आस्वाद घेत आनंद लुटला. या वेळी विविध महिला बचत गट व शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन सत्कार केला. महोत्सवात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्‍ज्वला बाणखेले, उपविभागीय कृषी अधिकारी एन. व्ही. फुलसुंदर, उरण तालुका कृषी अधिकारी अर्चना सुळ-नारनवर, तालुका कृषी अधिकारी खालापूर सुनील निंबाळकर, नायब तहसीलदार जी. बी. धुमाळ, कर्जत तालुका कृषी अधिकारी अशोक गायकवाड, पेण तालुका कृषी अधिकारी सागर वाडकर, मुरूड तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ, अलिबाग कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, मंडळ कृषी अधिकारी के. एल. शिगवण, कृषी अधिकारी अश्विनी जाधव, उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साळवे सहभागी झाले होते.

रानभाज्यांवर मार्गदर्शन
उरणमध्ये आदिवासी शेतकऱ्यांनी आणलेल्या कवळी, भारंगी, कुडा, दिंडा, शेवळी, फोडशी, सुरण, पिंपळ इत्यादी रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या या भाज्यांचे महत्त्व, आरोग्यासाठी होणारे फायदे, औषधी गुणधर्म याविषयी जिल्हा कृषी अधीक्षक उज्‍ज्वला बाणखेले यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

Pune University : पुणे विद्यापीठाला अखेर मिळाले कुलसचिव; छुप्या पद्धतीने नियुक्ती केल्याचा संघटनांचा आरोप

Pune News : विना अडथळा खोदकाम करता येणार; पाइपलाइन गॅस व सीएनजी वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश

SCROLL FOR NEXT