मुंबई

माझी वसुंधरा अभियानाची तयारी

CD

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : माझी वसुंधरा अभियान ४.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी, तसेच आझादी का अमृत महोत्सवांतर्गत ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अभियानाबाबत प्रशासकीय यंत्रणांना मार्गदर्शन केले जात आहे. याच अनुषंगाने कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात विभागस्तरीय कार्यशाळा होणार आहे.
निसर्गाशी असलेली कटिबद्धता वृद्धिंगत करण्यासाठी निसर्गाशी संबंधित भूमी, जल, वायू, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांना विचारात घेऊन राज्यामध्ये २ ऑक्टोबरपासून ‘माझी वसुंधरा अभियान’ राबवण्यात येत आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० चा शुभारंभ १५ जून रोजी झाला असून या अभियानात कोकण विभागातील सर्व महापालिका, नगर परिषदा, नगरपंचायती तसेच सर्व ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला आहे. या अभियानांतर्गत स्थानिक संस्थांना काम करण्यासाठी मिळणारा कालावधी १२ महिन्यांचा आहे. माझी वसुंधरा अभियान ४.० ची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याच्या उद्देशाने कार्यशाळेस राज्यस्तरावरून माझी वसुंधरा अभियान संचालनालय, मुंबईतील पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे अभियान संचालक सुधाकर बोबडे हे मार्गदर्शन करणार आहेत.
----------------------------------------------
या अभियानामध्ये २५ ते २९ वयोगटातील तरुणांनी सहभागी होऊन सर्व सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरे करावेत. तसेच वृक्षारोपणाला प्राधान्य देत ‘माझी वसुंधरा अभियान’ ४.० हे यशस्वी करावे.
-डॉ. महेंद्र कल्याणकर, आयुक्त (कोकण विभाग)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचे ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढते स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Marathi News Live Updates : उद्धव ठाकरे कुटुंबीयांसोबत ‘मुंबईच्या राजा’च्या दर्शनाला

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

जया बच्चन तयार होईपर्यंत बिग बी काय करतात? KBCमध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितला मजेशीर किस्सा, म्हणाले...'आमच्या फॅमेली ग्रुपवर मी...'

SCROLL FOR NEXT