मुंबई

आई ओरडल्याच्या रागातून मुलीने सोडले घर

CD

बोईसर, ता. २६ (बातमीदार) : आई ओरडल्याचा राग मनात धरून नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने सोमवारी (ता. २४) दुपारी शाळा सुटल्यावर सफाळे स्थानक गाठले. त्यानंतर थेट गुजरातमधील वलसाडमध्ये गेल्याचा प्रकार घडला होता. अखेर राग शांत झाल्यावर ती त्याच रात्री पुन्हा सफाळे स्थानकात आली. तेथील पोलिसांनी तिची विचारपूस केल्यानंतर तिला पालकांच्या हवाली केले.

माळकरी पाडा येथे राहणाऱ्या मुलीचे वडील सफाई कर्मचारी असून ती राजगुरू ह. म. पंडित विद्यालयात शिकत आहे. काही कारणास्तव १४ वर्षीय मुलीची आई तिला ओरडली होती. याचा राग आल्याने सोमवारी दुपारी शाळा सुटल्यावर ती घरी गेली नाही. मुलगी उशिरापर्यंत न आल्याने तिच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र कुठेही सापडली नाही. अखेर त्यांनी यासंदर्भात सफाळे पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. सहायक पोलिस निरीक्षक अमोल गवळी यांनी सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

सफाळे स्थानकात रात्री उशिरा मुलगी वावरताना दिसली. तिची पोलिस ठाण्यात नेऊन चौकशी केली. आई ओरडल्याच्या रागाच्या भरात गुजरातमधील वलसाड येथे गेल्याचे तिने सांगितले. पोलिसांना खात्री पटताच तिच्या पालकांना बोलावून तिची समजूत घातली आणि तिला वडिलांच्या ताब्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT