मुंबई

कुरिअर बॉयचा लिफ्टमळे मृत्यू

CD

नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : लिफ्ट दुरुस्तीचे काम करणाऱ्या टेक्निशियनच्या निष्काळजीपणामुळे एका कुरिअर बॉयचा लिफ्टमध्ये अडकून मृत्यू झाला आहे. नेरूळ सेक्टर-२१ मधील विघ्नहर सोसायटीत आठवडाभरापूर्वी ही घटना घडली असून पोलिसांनी या प्रकरणी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.
वाशीतील जुहू गाव सेक्टर-११ मध्ये राहणारा विशाल इंदुलकर (३५) विचारे एक्स्प्रेस ॲण्ड लॉजिस्टीक प्रा.लि. या कुरिअर कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉयचे काम करत होता. १८ जुलै रोजी विशाल नेरूळ सेक्टर-२१ मधील विघ्नहर सोसायटीत कुरिअर देण्यासाठी गेला होता. त्याचवेळी इमारतीच्या ए-१ विंगमधील लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने न्यू एशियन लिफ्ट कंपनीचा टेक्निशियन लिफ्टच्या दुरुस्तीचे काम करत होता. मात्र, दुरुस्तीचा फलक नसल्याने लिफ्टमध्ये जाणाऱ्या विशालचा गंभीर अपघात झाला होता. या प्रकरणी नेरूळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तसेच न्यू एशियन लिफ्ट कंपनीच्या टेक्निशियन, तसेच विघ्नहर सोसायटीचे सेक्रेटरी व चेअरमन यांनी दुरुस्तीवेळी काळजी घेतली नसल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 3rd ODI :भारताला क्लीन स्वीप करायचा असेल तर 'या' 3 गोष्टी कराव्याच लागतील; अफगाणिस्तानचा होणार सुपडा साफ!

Monsoon Tracker: दिल्ली होरपळतेय, मुंबई पाणी जपून वापरतेय... पाऊस नेमका अडकला कुठे? मान्सूनची अनपेक्षित सुस्ती

Amalner Crime : विवाहित असताना, दुसऱ्यांदा बोहल्यावर! ‘सीआरपीएफ’ कर्मचाऱ्याचा प्रताप; महिलेच्या शस्रक्रियेवेळी उघड झाला प्रकार

Donald Trump: ''खोटं बोलण्यालाही मर्यादा असतात..'', इटलीच्या पंतप्रधान मेलोनी ट्रम्प यांच्यावर चिडल्या, सोबत फोटो काढण्यावरुन वाद

Wagholi Water Supply Issue : वाघोलीचा पाणी पुरवठा शुक्रवार पासून पूर्णपणे बंद; वढू बुद्रुक येथील भीमा नदी बंधाऱ्यातील पाणी पूर्णपणे तळाला

SCROLL FOR NEXT