मुंबई

उरण तालुक्याला पुराची झळ

CD

उरण, ता. २६ ः रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक तालुक्यांतील जनजीवन विस्कळित झाले आहे. उरणमध्येही पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने वित्तहानी झाली आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील पूरपरिस्थितीचे पंचनामे उरण तहसील कार्यालयामार्फत करण्यात येत असून ३० गावांतील ३,५०० घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत.
चिरनेर गावातील ८०० पेक्षा अधिक कुटुंबांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे उरण तालुक्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. कित्येक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने किमती वस्तू, तसेच अन्नधान्याचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार उघड्यावर पडले असल्यामुळे पुरामध्ये नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे तहसील कार्यालयाच्या अंतर्गत करण्यात आले आहेत. तालुक्यातील ३० पूरग्रस्त गावांतील ३,५०० बाधित घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यामध्ये सारडे, पिरकोन, वशेणी, पुनाडे, पानदिवे, कडापे, आवरे गोवठणे, पाले, खोपटा, कोप्रोली, कळंबुसरे, चिरनेर, भोम, मोठी जुई, कंठवली, वेश्वी, दिघोडे यांचा समावेश आहे.
---------------------------------------------
उरण तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या ३० गावांतील साडेतीन हजार घरांचे पंचनामे करण्यात आले आहेत. लवकरच बाधितांना प्रशासनाकडून मदत दिली जाणार आहे.
-उद्धव कदम, तहसीलदार, उरण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Rohit Sharma on 2027 WC: निवृत्तीची चर्चा सुरूच होती, त्यात रोहित शर्माने २०२७ च्या वर्ल्ड कपबाबत केलं मोठं विधान; चाहत्यांना टेंशन

'जुळून येती रेशीमगाठी' मालिका ८० च्या दशकात असती तर कसे दिसले असते आदित्य- मेघना? AI ने बनवले कमाल फोटो

Ganesh Chaturthi 2026: गणपती बाप्पाला मोदकाचाच नैवेद्य का? जाणून घ्या मोदकामागचा खरा अध्यात्मिक अर्थ!

Marathi News Live Updates : ...तर गरबा उत्सवात सनातनी मुस्लिमांचे स्वागत करण्यास आपण तयार; अमोल ठाकरे यांची माहिती

SCROLL FOR NEXT