मुंबई

वांगणीतील कासगावावर दरडीचे संकट

CD

बदलापूर, ता. २६ (बातमीदार) : वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील उंच डोंगराच्या खाली वसलेल्या कासगावाची स्थिती आता इर्शाळवाडीसारखी झाली आहे. येथील टेकडीवरील माती वाहून गेली असून, काही मोठे दगड घरंगळत खाली आले आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात आमच्या गावातदेखील इर्शाळवाडीसारखी परिस्थिती होईल, अशी भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. त्यामुळे यावर स्थानिक प्रशासनाने त्वरित उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सह्याद्रीच्या कुशीत वांगणी आणि बदलापूरच्या मधोमध कासगांव वसलेले आहे. या गावात चारशे कुटुंबे असून लोकसंख्या सुमारे दोन हजार इतकी आहेत; मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून हे गावकरी ऐन पावसाळ्यात भीतीच्या छायेत वावरत आहेत. हे गाव डोंगराच्या उंच टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे; मात्र मागील तीन वर्षांपासून या टेकडीवरील माती वाहून जात आहे. तसेच काही बाहेरच्या भागातील व्यक्तींनी येथे माती उत्खनन केल्यामुळे मोठे दगड बाहेर आले आहेत. यंदा पावसाळ्यात यातील काही दगड घरंगळत खाली आले आहेत; मात्र यात कोणालाही दुखापत झालेली नाही. पण आता या गावची इर्शाळवाडीसारखी परिस्थिती होते का, अशी भीती हे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
…..

गावातील परिस्थितीची जाणीव प्रशासनाला गेल्या दोन वर्षांपासून वारंवार करून देत आहोत. संबंधित अधिकारी, तलाठी, सरपंच हे सगळे या ठिकाणी येऊन पाहणी करून गेले; मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे प्रशासन गावाची इर्शाळवाडी होण्याची वाट पाहत आहे का?
- राकेश शिंदे, ग्रामस्थ
…..
गावच्या धोक्यासंदर्भात आमच्या विभागाकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. ही जागा वन विभागाची असून, या ठिकाणी हे ग्रामस्थ राहत आहेत. मात्र असे असले, तरी जागा कोणाच्या मालकीची हे न पाहता, संबंधित अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पाहणी करून अहवाल लवकरच पुढे पाठवून लवकरच कार्यवाही केली जाईल.
- प्रशांती माने, तहसीलदार, अंबरनाथ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : सावधान! पीडित महिलांचे AI व्हिडिओ व्हायरल कराल तर जेलमध्ये जाल; नाशिक एसआयटी चा इशारा

Latur News: ‘भाकरीच्या चंद्राला’आता महागाईचा डाग; ज्वारी ५५ ते ६० रुपये किलो, उत्पादन क्षेत्र घटल्याने हुरडा पार्ट्यांवरही परिणाम

Latest Marathi News Live Update : कोकणवासियांसाठी मनसे मैदानात

Uddhav Thackeray: ‘ऑपरेशन टायगर’ची भीती? उद्धव ठाकरेंची खासदारांसोबत तातडीची बैठक; पक्षातील नाराजी दूर करण्याचा प्रयत्न

Aadhaar App Preload : "ही जबरदस्ती कशासाठी?" नवीन मोबाईलमध्ये आधार ॲप सक्तीचे; पण ॲपल-सॅमसंगचा सरकारला विरोध का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT