मुंबई

मुलुंडमध्ये वन्यभाजी महोत्सव

CD

मुलुंडमध्ये रानभाजी महोत्सव
मुलुंड, ता. २६ (बातमीदार) ः रानभाज्यांमध्ये अनेक प्रकारची खनिजे आणि शरीरासाठी उपयुक्त अशी जीवनसत्त्वे आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. पावसाळ्यात पिकवल्या जाणाऱ्या या विविध प्रकारच्या भाज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आदिवासी समाजाचा मोठा वाटा आहे आणि रानभाज्या विकून ते आपला उदरनिर्वाह करतात, किंबहुना हीच त्यांची उपजीविका असते. अशा आदिवासींना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यातील विविध शहरांमध्ये भाजीपाला लागवड करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
मुलुंडमध्ये महोत्सवाच्या आयोजनासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमांतर्गत मुंबईतील मुलुंडमध्ये प्रथमच या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंदीच्या काळात मुलुंडच्या जनतेने या उत्सवात उत्साहाने सहभागी होऊन आदिवासींना आर्थिक मदत करावी, असे आवाहन महाराष्ट्र सरकार आणि मराठमोळी मुलुंड संस्थेने केले आहे. या महोत्सवाचे आयोजन मुलुंड पूर्वेतील मुलुंड हायस्कूल हॉल, आंध्र बँकेजवळ, चंदनबाग रोड, पाच रास्ता, मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (ता. २९) सकाळी दहा ते सायंकाळी पाच यादरम्यान करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport: पुणे विमानतळाचा नवा विक्रम! एका दिवसात २१६ विमानांची वाहतूक; ३३ हजार प्रवाशांचा टप्पा पार

Timber Smuggling: गडचिरोलीत वनविभागाची मोठी कारवाई; ६० लाखांचे अवैध सागवान जप्त

Latest Marathi News Live Update : राज्यात आज कोकणासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता; IMD कडून यलो अलर्ट जारी

Krishna River Water Level : कोयना धरणातून 33 हजारांवर विसर्ग; कृष्णा नदीने ओलांडली 30 फुटांची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

NMC MBBS Admission: दिव्यांग विद्यार्थ्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार साकार; एमबीबीएस प्रवेशासाठी एनएमसीची नवी मार्गदर्शक तत्त्वे दिव्यांगत्वच्या टक्केवारीऐवजी क्षमता आणि कार्यक्षमतेला महत्त्व

SCROLL FOR NEXT