मुंबई

गारगाई नदीवर पुलाचा मार्ग मोकळा

CD

भगवान खैरनार : सकाळ वृत्तसेवा
मोखाडा, ता. २६ : मोखाड्यातील अतिदुर्गम कुर्लोद ग्रामपंचायतीमधील शेड्याचा पाडा येथील सुरेखा लहू भागडे या आदिवासी गर्भवती महिलेला नदीच्या प्रवाहातून लाकडी ओंडक्यावर बसून रस्त्याचे दुसरे टोक गाठावे लागले. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले. ‘सकाळ’ने ही बातमी प्रसिद्ध करून शासनाचे लक्ष वेधले आहे. या बातमीची दखल घेत येथील नागरिकांना पावसाळ्यात गारगाई नदीपार करण्यासाठी शासनाने येथे बोट उपलब्ध करून तात्पुरती व्यवस्था केली आहे. येथील
कुर्लोद ग्रामपंचायतीमध्ये नऊ पाड्यांचा समावेश होतो. यामध्ये कुर्लोद, गावठाण, वडपाडा, मानीपाडा आणि पेठेपाडा हे गारगई-पिंजाळ नदीच्या अलीकडच्या बाजूने वसलेले आहेत; तर रायपाडा, आंबेपाडा, जांभूळपाडा आणि शेड्याचा पाडा हे चार पाडे नदीच्या पलीकडे वसले आहेत. त्यामुळे येथील आदिवासींचा पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर संपर्क तुटतो. या चार पाड्यांतील नागरिकांना पावसाळ्यात कुठल्याच सुविधा मिळत नाहीत. आरोग्य सेवा न मिळाल्याने आतापर्यंत अनेकांना जीवही गमवावे लागले आहेत. शैक्षणिक व्यवस्थाही कोलमडते. त्यामुळे नदीवर पूल बांधण्याची येथील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी आहे.
दरम्यान, हे चार पाडे संपर्कात यावेत म्हणून शासनाने फेब्रुवारी महिन्यात गारगई-पिंजाळ नदीवर पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे. त्यासाठी ५ कोटी ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे अंदाजपत्रक बनवून तांत्रिक मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता विशाल अहिरराव यांनी दिली आहे. त्यामुळे येथे वर्षभरात पूल बांधण्याच्या तसेच आदिवासी मुख्य प्रवाहात येण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सरकारची तात्पुरती मलमपट्टी
आदिवासी गर्भवती महिलेला नदीच्या प्रवाहातून ओंडक्यावर बसून रस्त्याचे दुसरे टोक गाठावे लागल्याची बातमी ‘सकाळ’ने प्रसिद्ध केल्यानंतर सरकार आणि यंत्रणा खडबडून जागी झाली. या घटनेचे पडसाद विधानसभेतही उमटले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना पावसाळ्यात नदी पार करण्यासाठी शासनाने बोटीची व्यवस्था केली आहे. तसेच ती बोट आजच उपलब्ध होणार असल्याची माहिती तहसीलदार मयूर खेंगले यांनी दिली आहे. मात्र ही सरकारची तात्पुरती मलमपट्टी असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT