मुंबई

पारसिक हिलचे अस्तित्व पणाला

CD

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २६ ः बेलापूर येथील पारसिक हिलची मालकी नवी मुंबई महापालिकेकडे नसल्याने महापालिकेने वन विभाग, ठाणे एमआयडीसी आणि सिडकोला पारसिक हिलचे संरचना सर्वेक्षणाचे काम करावे, असे आवाहन केले आहे; परंतु संबंधित विभागांना त्याचे काही सोयरसुतक नसल्याने संरचना सर्वेक्षणाचे ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ अशी अवस्था होणार आहे.
इर्शाळवाडी दरड दुर्घटना घडल्यानंतर खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने सर्व सरकारी यंत्रणांना डोंगरावरील आणि धोकादायक अवस्थेचे संरचना परीक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच अतिधोकादायक असल्यास येथील नागरिकांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी संबंधित सरकारी यंत्रणांना दिली आहे. बेलापूर येथील पारसिक हिलवर अनेक इमारती, मंदिरे आणि आलिशान बंगले आहेत. तसेच पायथ्याशी रुग्णालय आणि पेट्रोल पंप आहे. डोंगराच्या एका भागात बेकायदा झोपडपट्टी आहे, तर दुसरीकडे खासगी विकासकाने खोदकाम केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात जमिनीची धूप होऊन उतारावरील पाण्यासोबत माती वाहून येण्याचे प्रकार घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर डोंगराच्या मातीचे परीक्षण करण्याची मागणी ग्रीन्स आणि नॅट कनेक्टने महापालिकेकडे केली आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी तात्काळ शहर अभियंते संजय देसाई यांना सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते; परंतु या डोंगराची मालकी असणारा भाग वन, एमआयडीसी आणि सिडकोकडे असल्याचे समोर आल्याने डोंगराचे संबंधित यंत्रणांनी परीक्षण करण्याचे काम करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-----------------------------------
सिडको निद्रावस्थेत
इर्शाळवाडीवरील दुर्घटना घडल्यानंतर सर्वच सरकारी यंत्रणांना डोंगरावरील वाड्या आणि वस्त्या धोक्यात आल्यामुळे परीक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. तरीही सिडको वेगळ्या आदेशाची वाट पाहत आहे. या डोंगरावरील बहुतांश भूखंडांची मालकी सिडकोकडे आहे. तसेच सिडकोने त्या भूखंडांची विक्री करून खोदकामाची परवानगीही दिली आहे. मात्र, तरीही सिडकोला अद्याप आदेश आले नसून चौकशी करून परीक्षण करू, अशी माहिती सिडकोचे शहर अभियंते राजन धायटकर यांनी दिली.
----------------------------------
उत्तरदायित्व शून्य अधिकार या तत्त्वाने सिडको, नवी मुंबई महापालिका, वन विभागाचा कारभार चालू असल्याने पारसिक हिलला बांधकामांचा विळखा पडला आहे, पण पारसिक हिलच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- सुधीर दाणी, प्रवर्तक अलर्ट सिटिझन्स फोरम, नवी मुंबई

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT