मुंबई

नोकरीच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. २६ : मलेशियन एअर लाईन्समध्ये नोकरीची संधी असल्याचे प्रलोभन दाखवत डोंबिवलीतील तरुणाची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नोकरी व पैसेही परत मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी आदित्य दीक्षित याने याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार आरोपी प्रदीप ढोणे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई येथे राहणाऱ्या प्रदीप याने चार वर्षांपूर्वी आदित्य याला मलेशियन एअरलाईन्स कंपनीत आपली ओळख असून तेथे ॲडमिरल एव्हिएशनमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध आहे, असे सांगितले. आदित्य याने प्रदीपच्या बोलण्यावर विश्वास ठेवत प्रदीपला ५ लाख २० हजार रुपये दिले. पैसे देऊन झाल्यानंतर आदित्य यांनी आपणास प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी कधी मिळेल, म्हणून प्रदीपकडे विचारणा सुरू केली. आरोपीच्या वेळकाढूपणामुळे आदित्यला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, सततच्या पाठपुराव्याने आरोपीने आदित्यला २ लाख २० हजार रुपये परत केले. चार वर्षांच्या कालावधीत उर्वरित ३ लाखांची रक्कम परत करण्यास प्रदीपने नकार दिल्याने आदित्यने प्रदीप विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PNG-LPG Rate: घरगुती गॅसच्या दरांत पुन्हा वाढ! सर्वसामान्यांना मोठा फटका; आता गॅससाठी किती पैसे मोजावे लागणार?

Chhatrapati Sambhajinagar: बनावट आधार कार्ड, परदेशात व्यवहार; केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने वाळूजमधून युवकाला घेतले ताब्यात, नऊ तास चौकशी

Jalgaon: मामाच्या मुलीशी लग्न ठरलेलं, २५ वर्षीय तरुण अल्पवयीन प्रेयसीसोबत लॉजवर गेला, तिथंच आयुष्य संपवलं; तरुणीसह लॉजचालक ताब्यात

Latest Marathi Update Live: पंढरपूर कुर्डुवाडीत कुस्त्यांची दंगल

रेड एफएम मराठी फिल्म फेस्टिव्हल सीझन ६ चा भव्य आणि दिमाखदार समारोप

SCROLL FOR NEXT