मुंबई

म्हाडा भाडेकरूंचे आंदोलन स्थगित

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ ः म्हाडा पुनर्रचित इमारतींच्या पुनर्विकासाच्या मुद्द्यावरून मुंबईतील ३८८ विनाउपकरप्राप्त इमारतीतील भाडेकरू कुटुंबांनी आझाद मैदानात आंदोलनाचा इशारा दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औचित्याच्या मुद्द्यावरील प्रश्नाला उत्तर देताना भाडेकरूंच्या मागणीनुसार या इमारतींचा पुनर्विकास ३३ (७) अंतर्गत केला जाईल, याबाबत आश्वासन दिल्याने म्हाडा भाडेकरूंचे आज होणारे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती म्हाडा संघर्ष कृती समितीने दिली आहे.
म्हाडा पुनर्रचित इमारतींचा विकास ३३ (७) अंतर्गत करण्यात यावा, अशी मागणी म्हाडा पुनर्रचित इमारतीतील भाडेकरू करत आहेत. तसेच या इमारतींचा पुनर्विकास करत असताना म्हाडानेही त्यात असावे, अशी मागणी भाडेकरूंची होती. या कारणाने आज (ता. २७) आझाद मैदानात ३८८ इमारतींतील २७ हजार भाडेकरूंनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हा मुद्दा विधानसभेतही उपस्थित करण्यात आला. आमदार अजय चौधरी आणि आमदार सदा सरवणकर यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित करून भाडेकरूंना न्याय द्यावा, अशी मागणी केली. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडा पुनर्रचित इमारतींचा विकास ३३(७) अन्वये केला जाईल, असे आश्वासन दिले.
...
आदेश निघण्याची आशा
म्हाडा संघर्ष कृती समितीची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे २७ जुलैला धरणे आंदोलनास स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिले आहे. त्यावर आमचा विश्वास आहे. लवकरच याबाबत शासकीय आदेश निघेल, अशी आम्हाला आशा आहे. जर सरकारने शासकीय आदेश काढण्याबाबत दिरंगाई केली, तर पुन्हा विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान धरणे आंदोलन करण्यात येईल, असे म्हाडा संघर्ष कृती समितीकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: अखेर पडला राहूल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब! मोबाईलवर OTP आले आणि काँग्रेसचे मतदार डिलीट झाले, कशी झाली वोट चोरी

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्रातील राजुरामध्ये ६ हजार ८५० मते वाढली- राहुल गांधी

Gold Ring Scheme : सरकारी दवाखान्यात जन्म घेणाऱ्या मुलींना मिळणार सोन्याची अंगठी, खासदार धनंजय महाडिक यांची मोठी घोषणा

'दशवतार' सिनेमा ऑनलाइन लीक! अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली...'आपल्याच माणसांनी असं...'

सुरू होतोय Amazon Great Indian Festival 2025 Sale; स्मार्टफोन, लॅपटॉपसह 'या' २० वस्तूंवर ८०% पर्यंत डिस्काउंट

SCROLL FOR NEXT