

Election Commission issues notice to cricketer Mohammed Shami over SIR matter
esakal
Mohammed Shami receives Election Commission notice : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याच्या भावाला निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. या दोघांना विशेष सघन पुनरावलोकन (SIR) साठी समन्स बजावले आहे. ही प्रक्रिया १६ डिसेंबरपासून सुरू झाली होती.
सोमवारी दक्षिण कोलकात्याच्या जादवपूर परिसरातील कार्टजू नगर शाळेतून त्यांना नोटीस जारी केली गेली, ज्यामध्ये त्यांना सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले गेले आहेत.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये पश्चिम बंगालकडून खेळल्यामुळे मोहम्मद शमी वेळेवर सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही आणि तो सध्या राजकोटमध्ये आहे. शिवाय, शमीने त्याच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करणारे निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते.
शमीने लिहिले होते की, "मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावृत्तीबाबत ५ जानेवारी २०२६ रोजी तुमच्या कार्यालयात हजर राहण्याबाबत मिळालेल्या नोटीस संदर्भ मी लिहित आहे. मी तुम्हाला आदरपूर्वक कळवत आहे की, सध्या स्थानिक क्रिकेट सामन्यांमध्ये माझा सहभाग असल्याने, अधिकृतपणे बंगाल राज्य संघाचे प्रतिनिधित्व करत असल्याने, मी नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेवर होणाऱ्या सुनावणीला उपस्थित राहू शकणार नाही."
शमी कोलकाता महानगरपालिका वॉर्ड क्रमांक ९३ मध्ये मतदार म्हणून नोंदणीकृत आहेत. हा परिसर रासबिहारी विधानसभा मतदारसंघात येतो. मूळचा उत्तर प्रदेशातील अमरोहा येथील रहिवासी असलेला शमी हा बऱ्याच काळापासून कोलकाता येथे राहत आहे. तर निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, शमी आणि त्याच्या भावाचे नाव जनगणनेच्या फॉर्ममधील त्रूटींमुळे सुनावणी यादीत आले. आता शमीच्या प्रकरणाची सुनावणी ९ ते ११ जानेवारी दरम्यान होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.