मुंबई

शेअर बाजारात तेजी परतली

CD

मुंबई, ता. २६ ः तीन दिवसांच्या स्थिर वातावरणानंतर शेअर बाजारात तेजी पुन्हा परतली. आज (ता. २६) ३५१.४९ अंश वाढलेला सेन्सेक्स ६६,७०७.२० अंशांवर बंद झाला, तर ९७.७० अंश वाढलेला निफ्टी १९,७७८.३० अंशांवर स्थिरावला.

आज ग्राहकोपयोगी वस्तूंचे क्षेत्र वगळता अन्य क्षेत्रे तेजीत होती. त्यातही एफएमसीजी, सरकारी बँका, बांधकाम व्यवसाय, ऑईल अँड गॅस ही क्षेत्रे सर्वात जास्त वाढली. लार्सन अँड टुब्रोचा निकाल चांगला आल्यामुळे, तसेच त्यांनी शेअरची पुनर्खरेदी (बायबॅक) करण्याची घोषणा केल्यामुळे या शेअरचा भाव वाढला, तर टाटा मोटर्सचाही निकाल चांगला आल्यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडेही गेले. अरबिंदो फार्माच्या उपकंपनीच्या तेलंगणा प्रकल्पावर अमेरिकेच्या एफडीएने ताशेरे न मारल्याने तो शेअरही वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर (७८८ रु.) गेला.

आज सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी १९ शेअरचे भाव वाढले, तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३१ शेअरचे भाव वाढले. बीएसईवर लार्सन अँड टुब्रो तीन टक्के वाढला. आयटीसी दोन टक्के वाढला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, सन फार्मा, अॅक्सिस बँक, कोटक बँक, इन्फोसिस, इंडसइंड बँक, स्टेट बँक एक टक्का वाढले; तर बजाज फायनान्स दोन टक्के घसरला. बजाज फिन्सर्व्ह, महिंद्र आणि महिंद्र, टेक महिंद्र, एशियन पेंट या शेअरचे भावही एक टक्क्याच्या आसपास घसरले.
................
गेल्या तीन दिवसांच्या स्थिर वातावरणानंतर आज पडलेल्या भावात गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे शेअरबाजारात तेजी आली. आता अमेरिकी फेडरल बँकेच्या बैठकीवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेस
....................................
रुपया तेरा पैसे घसरला
अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपया तेरा पैसे घसरून ८२ वर बंद झाला. आज व्यवहारांना सुरुवात होताना रुपया ८१.८९ वर खुला झाला. दिवसभरात तो ८१.८७ पर्यंत सावरला, तर ८२.०२ पर्यंत घसरला होता. मंगळवारी रुपया ८१.८७ वर बंद झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या धमकीमुळे सोनं स्वस्त! महिन्यात 13 हजारांची घसरण; पाहा आजचा ताजा भाव

IPL 2026: आवेश खानच्या अतिउत्साहाने फिरवलं असतं रिषभ पंतच्या मेहनतीवर पाणी; पण SRH च्या चूक लक्षातच आली नाही अन्...

129,999 किंमतीचा सॅमसंग प्रीमियम स्मार्टफोन 25 हजारात; खरेदीसाठी गर्दी, कुठे सुरुय जबरदस्त ऑफर? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : आसाम विधानसभा निवडणुकीत एनडीएला ९५ जागा मिळतील, भाजप उमेदवाराचा दावा

Baramati By-Election : मोठी बातमी ! लक्ष्मण हाकेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार, दत्तात्रय भरणेंच्या शिष्टाईला यश

SCROLL FOR NEXT