मुंबई

ट्रकमेनमुळे कसारा घाटात मोठी दुर्घटना टळली

CD

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सह्याद्री पर्वतरांगांत असलेल्या मध्य रेल्वे मार्गातील कसारा कर्जत घाटामधून पावसाळ्यात रेल्वे गाड्या सुरक्षित धावाव्यात याकरिता रेल्वेचे ट्रॅकमन डोळ्यात अंजन घालून लक्ष ठेवतात. मध्य रेल्वेच्या दोन ट्रकमेनच्या सतर्कतेमुळे शनिवारी इगतपुरी ते कसारा घाटात मालगाडीचा मोठा अपघात टळला.
शनिवारी (ता. २२) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास इगतपुरी ते कसारादरम्यान अप मुख्य मार्गावर एक लोटिंग मालगाडी मुंबईच्या दिशेने येत होती. या मालगाडीचे अचानक कपलिंग तुटल्याने ती दोन भागांत विभागाली गेली. त्याच वेळी रेल्वे रुळांवर कर्तव्यावर असलेले ट्रॅकमन संजय उगले यांना ही घटना लक्षात आली. प्रसंगावधान राखत त्यांनी धावत जाऊन इगतपुरीच्या दिशेने (मागच्या बाजूने) मालगाडीला प्रोटेक्शन करून त्याची सूचना तात्काळ वरिष्ठांना दिली. ट्रॅकमन मंगेश आव्हाड यांनी मालगाडी मागे घसरू नये यासाठी मार्गातील मोठे दगड उचलून ते मालगाडीच्या चाकांमध्ये लावले. त्यामुळे कपलिंग तुटलेला मालगाडीचा मागचा भाग रुळांवरच स्थिर उभा राहिला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी दाखवलेले प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे मालगाडीचा अपघात टळला. ट्रॅकमन संजय उगले आणि मंगेश आव्हाड यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळल्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
...
घाटातील कर्मचारी सतर्क
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये कधी सोसाट्याचा वारा, कधी मुसळधार पाऊस, कधी कडाक्याची थंडी; तर कधी अंग भाजून काढणारे रणरणते ऊन असते. त्यात जंगली श्वापदांचा वावर, सततचे पाण्याचे दुर्भिक्ष अशा बिकट परिस्थितीत हे रेल्वेचे ट्रॅकमन, की मॅन आणि हिल गॅंगचे कर्मचारी काम करतात. त्यांच्या सतर्कतेमुळे अनेक रेल्वे दुर्घटना टळल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT