मुंबई

हनुमानाची गदा चोरली

CD

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २७ : कल्याण पश्चिमेतील घोडेखोत आळीतील श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात मंगळवारी पहाटे चोरीची घटना घडली होती. मंदिरातील चांदीची गदा, मुकुट, रुईच्या पानांचा हार, इतर दागिने, साहित्य यांसह दान पेटीतील रोकड चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा भिवंडी गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने चोवीस तासांत उलगडा करत भिवंडीतून साकीब उर्फ सलमान मोहंमद अख्तर अन्सारी (वय २४) याला अटक केली.
कल्याण पश्चिमेतील घोडेखोत आळीत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. मंगळवारी पहाटे या मंदिरात चोरीची घटना घडली होती. चोरट्याने मंदिराची लोखंडी जाळी तोडून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर मंदिरातील हनुमानाची सव्वा किलो वजनाची चांदीची गदा, मुकुट, देवाच्या वरील छत्र, चांदीच्या रुईच्या पानांचा हार यांसह दान पेटीतील ६,४७० रुपयांची रोकड आणि सीसी टीव्हीचा डिव्हीआर असा मुद्देमाल लंपास केला होता. बाजारपेठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणाचा समांतर तपास बाजारपेठ पोलिसांसह भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला.
मंदिरात चोरी करणारा चोरटा हा भिवंडीतील शांतीनगर भागातील जब्बार कंपाऊंडमध्ये राहत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीद्वाराद्वारे मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने परिसरात सापळा रचून साकीब उर्फ सलमान याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.
…..
आणखी दोन गुन्ह्यांची उकल
भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आणखी दोन गुन्ह्यांची उकल केली आहे. भिवंडी शहरात सोन्याचे नकली दागिने दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका भामट्याला कोनगाव परिसरात २५ जुलै रोजी सापळ रचून जेरबंद केले आहे. अजय वाघेला (२३) असे या आरोपीचे नाव आहे. भिवंडी शहरातून चोरीस गेलेले व हरवलेले ४२ मोबाईल हस्तगत करून ते संबंधित मोबाईल मालकांना परत दिले आहेत. तांत्रिक बाबींच्या आधारे शोध घेतला असता ४२ मोबाईल एकूण ५ लाख ७९ हजार रुपये किमतीचे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT