मुंबई

कुलाबा धोबीघाट येथील रस्ता खड्ड्यात

CD

पालिका आयुक्‍तांकडे तक्रार, रहिवाशांची गैरसोय
मुंबादेवी, ता. ३१ (बातमीदार) : दक्षिण मुंबईतील कुलाबा धोबीघाट येथील अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे. याप्रकरणी पालिका ए विभागात तक्रारी करण्यात आल्‍या आहेत. तरीही रस्त्याची डागडुजी न केल्‍यास नागरिकांकडून नाराजी व्‍यक्‍त करण्यात येत आहे, तर याप्रकरणी थेट पालिका आयुक्‍तांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे.
कुलाब्यातील बॅक बे डेपो, धोबीघाट, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, कफ परेड पांडे रोड, बुधवार पार्कसमोरील रस्‍त्‍यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स, तसेच विविध राज्य सरकारी कार्यालये या विभागात आहेत. गतसाली येथे कमरेपेक्षा जास्त पाणी भरले होते. यावर्षीदेखील येथील रस्‍त्ते खड्डेमय झाल्‍याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवसेना प्रभाग २२७ चे शाखाप्रमुख हरेश कनौजिया यांनी यावर्षीही हाच मुद्दा उपस्थित केला. रस्ते दुरुस्तीसाठी त्यांनी पालिकेत तक्रार केली, पण कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी कोणतीही कारवाई केली गेली नाही. खराब रस्त्यांमुळे वाहनचालकांसह नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्‍यामुळे पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी तातडीने याची दखल घेत रस्ते दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी हरेश कनोजिया यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात घसरण कायम! 10 दिवसांत 15 हजारांनी सोनं स्वस्त; पाहा महाराष्ट्रातील आजचे ताजे दर

IPS Aparna Kaushik Video: कोण आहेत IPS अपर्णा कौशिक? १८ लाखांचे पॅकेज सोडून बनल्या 'लेडी सिंघम'; 'बॉडी शेमिंग'मुळे नवा वाद!

Latest Marathi News Live Update : शिर्डीला पायी जाणाऱ्या साईभक्तांचा अपघात; भरधाव कारने दिली धडक

Pandharpur Chaitra Ekadashi : लाखो भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! पंढरपुरात 'या' तारखेपर्यंत VIP दर्शन पूर्णपणे बंद; विठ्ठलाच्या दर्शनापूर्वी हा नियम जाणून घ्या

Iran Missile Attack Near India : युद्धाची धग भारतापर्यंत, इराणचा हिंद महासागरातल्या बेटावर क्षेपणास्त्र हल्ला

SCROLL FOR NEXT