मुंबई

पावसाचा फायदा रासायनिक पाण्याचा विसर्ग

CD

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली, ता. ३१ : कल्याण ग्रामीणमधील १४ गावांतून वाहणाऱ्या उत्तरशिव नदीच्या पाण्यावर सफेद रंगाचा तवंग आला आहे. तसेच काही ठिकाणी नदीच्या पाण्याला फेसही येत आहे. नदीच्या पात्रात सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे नदीचे पात्र दूषित झाले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. सतत सुरू असणाऱ्या पावसाचा फायदा घेत काही भंगारमाफियांनी रासायनिक द्रव्य नदीत सोडले आहे. यापूर्वीही अनेकदा नदीच्या पाण्यात रसायन सोडले जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होऊन शेतीचे नुकसान झाले असल्याचे ग्रामस्थ सांगतात.
उत्तरशिवच्या नदीचा उगम हा ठाकूरपाडा डोंगरावरून झाल्यानंतर ती दहिसर-मोकाशी पाडामार्गे उत्तरशिव नागावनंतर देसाई खाडीला जाऊन मिळते. मात्र या नदीत सोडल्या जाणाऱ्या घातक रसायनांमुळे नागरिकांच्या आरोग्यासह जलचरांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. कल्याण ग्रामीण भागातील १४ गावांमधून वाहणाऱ्या उत्तरशिवच्या नदीत रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदी प्रदूषित झाली आहे. रविवारी सकाळपासून सुरू असणाऱ्या पावसाचा फायदा घेत भंगार माफियांनी रसायनयुक्त पाणी नदीत सोडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे दुपारनंतर नदीच्या पाण्याला फेस येत असून पाण्यावर सफेद रंगाचा तवंग आला आहे.
उत्तरशिव नदीच्या किनारी शेतकरी शेती, तसेच मासेमारी करत आपला उदरनिर्वाह करत आहेत. शेतात फळ-भाज्यांची लागवड केली जाते, तर पावसाळ्यात भाताचे पीक घेतले जाते. ग्रामीण भागात भंगाराची गोदामे मोठ्या प्रमाणात आहेत. या गोदामांमधून अनेकदा रासायनिक द्रव्य छुप्या पद्धतीने नदीत सोडले जातात. यापूर्वीही नदीच्या पाण्यात रसायन सोडले गेल्याने नदीच्या पाण्याला वेगवेगळे रंग व उग्र वास येत होता. याविषयी स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत असल्याचे ग्रामस्थ सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

पदराने अचानक पेट घेतला, केसांपर्यंत आग गेली! जुई गडकरीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग, म्हणाली...'पाठीला जोरात चटका बसला अन्...'

कौटुंबिक वाद विकोपाला! भांडणात पतीच्या गुप्तांगाला चावा घेतला, संतापलेल्या पतीने पत्नीचं थेट नाक कापलं; घटनेने खळबळ

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

SCROLL FOR NEXT