मुंबई

संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : साईबाबा, राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा जोतिबा फुले, राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करा, अशी मागणी उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते व ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिली.
महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणारे संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करण्यासाठी सोमवारी (ता. ३१) दुपारी १२.३० वाजता ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, ठाणे शहर (जिल्हा) च्या वतीने शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी आनंद परांजपे बोलत होते. साईबाबांना लाखो लोक दैवत मानतात पण साईबाबा हे देव नाहीत, त्यांना देव्हाऱ्यात बसवू नका, असे लोकांच्या भावनेचा अवमान करणारे बेताल वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे; तर राष्ट्रपिता महात्माा गांधी, महात्मा फुले, राजा राममोहन रॉय आदी महनीय व्यक्तींविरोधात अकोला, परभणी आदी ठिकाणी बेताल वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात महाराष्ट्रात ठिकठिकाणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे संभाजी भिडे यांनी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब अटकेचा आदेश द्यावा अशी मागणी आनंद परांजपे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: महापालिकेच्या जागेवर बेकायदा खाऊगल्ली; कर्वेनगरमधील प्रकार; आर्थिक फायद्यासाठी खासगी वापराचा आरोप

IPL 2026: जॉस हेडलवूड बंगळुरूत आलाय, पण RCB साठी पहिला सामना का खेळणार नाही? समोर आलं मोठं कारण

Pune News: विद्यापीठात साकारणार स्वतंत्र पदवी प्रशाळा;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची घोषणा

Latest Marathi News Live Update : कोकणचा राजा हापूस आणि पायरी आंबा बाजारात दाखल

IPL 2026: आयपीएलचा धूमधडाका आजपासून; १० संघ, १३ ठिकाणे, ७० साखळी सामन्यांची मेजवानी

SCROLL FOR NEXT