मुंबई

बेस्ट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात

CD

बेस्ट कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
आगारातील स्वच्छतागृहांची दुरवस्था
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ ः मुंबई आणि उपनगरातील २७ बेस्ट आगारांतील बहुतांश कर्मचारी स्वच्छतागृहे अत्यंत अस्वच्छ स्थितीत आहेत. त्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबईत २७ बेस्ट बस आगार असून ५१ बसस्थानक आणि ११२ टर्मिनस आहेत. बेस्टमध्ये २४ हजार कामगार काम करीत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या बहुतांश स्वच्छता गृहे अस्वच्छ आहेत. त्यांच्याकडे बेस्ट प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मोहिमेवर भर देत आहेत, तर दुसरीकडे देशाच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वात मोठी परिवहन सेवा असलेल्या बेस्ट उपक्रमात कर्मचाऱ्यांना नाक मुठीत धरून स्वच्छता गृहात जावे लागते. बस आगरातील अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे कर्मचाऱ्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत १५ ऑगस्ट २०२३ पूर्वी या आगारातील सर्व स्वच्छतागृहे स्वच्छ करण्याचे आदेश आणि उपाययोजना कराव्यात, अन्यथा, देशाच्या ७६ व्या स्वातंत्र्यदिनी शौचालय स्वच्छता मोहीम हाती घेत आणि देशातील सर्वात मोठ्या परिवहन उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सोयी आणि आरोग्याबाबत प्रशासनाची असंवेदनशीलता आणि उदासीनता उघड करु, असा इशारा भारतीय जनता पक्ष (कामगार आघाडी) मुंबई प्रदेशाचे अध्यक्ष गणाचार्य यांनी दिला आहे.
सर्वच आगारातील स्वच्छतागृहे अस्वच्छ स्वच्छतागृहांमुळे दयनिय झाली आहे. त्यामुळे कामगारांची मनस्थिती बिघडते आणि त्याचा कामावर परिणाम होतो, असे बेस्ट समितीचे माजी सदस्य गणाचार्य यांनी म्हटले आहे. दरम्यान, स्वच्छतागृहांची स्वच्छता राखण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात असे पत्र बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक विजय सिंघल यांना दिल्याचे गणाचार्य सांगितले.

शौचालयाची दररोज स्वच्छता झाली पाहिजे. त्याची स्वच्छता केली जात नसल्याने त्यांची दुर्गंधी वाढते. घाण पाणी तुंबून राहते. त्यात डास निर्माण होतात. त्यामुळे आजार वाढत आहेत.
- चालक, घाटकोपर

सर्वच कर्मचार्‌यांना अस्वच्छ स्वच्छतागृहामुळे त्याचा त्रास होतोय. कायम स्वरूपी स्वच्छता कर्मचार्‌यांची नियुक्ती करावी. बेस्टचे आगर प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
- वाहक, मरोळ आगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

स्वस्त हॉटेल, कमी बजेट आणि इंटीमसीचा भडीमार, कुठे आणि कसा शूट होतो बी-ग्रेड सिनेमा?

Panand Road Scheme : अक्षय तृतीयेला पाणंद रस्ते योजनेचा प्रारंभ, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Nashik sex scandal: खरातनंतर नवं सेक्स स्कँडल! चोरी गेलेला टॅब ठरला संकट, २०० व्हिडिओंनी उघड केलं मोठं रहस्य, तक्रारदारच अडकला

Pune Ring Road Work Accident : पुण्यात रिंग रोडच्या कामावेळी तरुणाचा बुडून मृत्यू, शिडीवर चढताना पाय घसरला अन्, ४० फूट नदीपात्रात कोसळला

SCROLL FOR NEXT