मुंबई

मणिपूर महिला अत्याचारप्रकरणी कडकडीत बंद

CD

जव्हार, ता.३१ (बातमीदार) : मणिपूरमधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराचा देशभरातून निषेध केला जात आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हारमध्येही याचे पडसाद उमटले आहेत. सोमवारी मणिपूर घटनेचा निषेध नोंदवत युवा आदिवासी संघ व आदिवासी सामाजिक संघटनांकडून जव्हार बंदची हाक दिली होती. या बंदला जव्हार तालुक्यातील व्यापारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. सोमवारी सकाळपासून पूर्ण दिवस आपली दुकाने बंद ठेवली, फक्त अत्यावश्यक सेवा वगळता १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.

मणिपूरमधील आदिवासी महिलांवर झालेल्या अन्यायाचा आदिवासी क्रांतिकारक चौक येथे सर्व आदिवासी समाज बांधव एकत्रित येत निषेध केला. तसेच अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील ईर्शाळवाडी येथे झालेल्या नैसर्गिक आपत्तीतील मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर आदिवासी क्रांतिकारक चौक येथून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, सचिन शिंगडा, सभापती विजया लहारे, विनायक राऊत, दयानंद लहारे, तुळशीराम मोरघा, युवा आदिवासी संघाचे अध्यक्ष प्रवीण पवार, कार्याध्यक्ष राजू भोये, सचिव झाप ग्रामपंचायतचे सरपंच एकनाथ दरोडा, कल्पेश राऊत, मनोज कामडी, व सर्व पदाधिकारी, महिला अध्यक्ष वंदना ठोंबरे, इतर महिला भगिनी व सर्व आदिवासी समाज संघटना व सहभागी झाले.

प्रतिक्रिया
मणिपूरमध्ये महिलांवर झालेला अत्याचार हा आमानवी आहे. केवळ निषेध नोंदवणे, मोर्चे काढणे, बंद पुकारणे हा पर्याय नसून तेथील शासनाने अशा नराधमांवर फास्ट ट्रक न्याय व्यवस्थेतून कठोर कारवाई केली पाहिजे. - सचिन शींगडा, पालघर जिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Update: महाराष्ट्रात धोक्याची घंटा! पुढील २४ तासांत ३१ जिल्ह्यांना वादळ-पावसाचा तडाखा, IMD चा मोठा इशारा

Latest Marathi News Live Update : पुढील चार दिवस राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता

Amit Thackeray: मनसेचे अमित ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, मोहोळ तालुक्यातील गारपीटग्रस्त पिकांची पाहणी, मुख्यमंत्र्यांकडे करणार नुकसानभरपाईची मागणी!

आमदार यड्रावकरांचे ३१ लाखांचे बील थकीत तरी महावितरणचा कानाडोळा, ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे कनेक्शन तोडलं; 'स्वाभिमानी'चा गंभीर आरोप

Gachiroli News: गडचिरोलीत वैशाखापूर्वीच वाढला उन्हाचा पारा; भर दुपारी रस्ते सुनसान; उन्हाच्या तिव्रतेमुळे आत्तापासूनच अनेकजण हैराण

SCROLL FOR NEXT